Breaking

युसुफवडगाव हद्दीत घरफोडी आणि दुचाकी चोरी; लाखाचा ऐवज लंपास

Updated: एप्रिल 21, 2026

By Vivek Sindhu

युसुफवडगाव हद्दीत घरफोडी आणि दुचाकी चोरी; लाखाचा ऐवज लंपास

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

युसुफवडगाव: केज तालुक्यातील होळ आणि पळसखेडा येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने आणि दुचाकी असा एकूण १ लाख १७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

हिंगावर व्यंकटराव शिंदे यांच्या घरात चोरट्यांनी गेटचे कुलूप तोडून प्रवेश केला. कपाटातील ६७ हजार रुपयांचे दागिने आणि रोख ४ हजार रुपये त्यांनी लांबवले. त्याच रात्री पळसखेडा येथून ऋषीकेश चव्हाण यांची ५० हजार रुपयांची दुचाकी (MH44AA8922) देखील चोरीला गेली. युसुफवडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक माजरे तपास करत आहेत.


Related Posts :

Categories

Recent Posts