Breaking
Updated: एप्रिल 21, 2026
मिरची पूड टाकून लोखंडी गजाने मारहाण
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelशिरूर कासार: शेतातील आयशर टेम्पो चालकाचा नंबर मागण्याच्या कारणावरून झालेल्या वादात फिर्यादीच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लोखंडी गजाने मारहाण केल्याची संतापजनक घटना वारणी येथे घडली आहे. या प्रकरणी विठ्ठल लक्ष्मण केदार यांनी तक्रार दिली आहे.
आरोपी आजिनाथ केदार, पवन केदार, अक्षय केदार आणि सुमन केदार यांनी फिर्यादीला टेम्पो चालकाचा नंबर मागितला. नंबर नसल्याचे सांगितल्यावर आरोपींनी लोखंडी गजाने फिर्यादीच्या पायावर आणि डोळ्याखाली प्रहार केला. इतकेच नव्हे तर फिर्यादीच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड टाकून त्यांना अगतिक केले. फिर्यादीची पत्नी भांडण सोडवायला आली असता तिलाही मिरची पूड टाकून लाकडी काठीने मारहाण करण्यात आली. शिरूर कासार पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.