Breaking

गाडीचा हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून अंबाजोगाईत तरुणाला फायटरने मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

Updated: जून 2, 2026

By Vivek Sindhu

केज येथे दोन टेम्पोच्या २० हजाराच्या बॅटऱ्या चोरल्या

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: येथील पाटील हॉस्पिटलसमोरील मेडिकलजवळ गाडीचा हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून एकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. वाढदिवस साजरा करत असताना हॉर्न वाजवून त्रास का दिला, अशी कुरापत काढून आरोपींनी फिर्यादीला फायटर आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेपवाडी येथील रहिवासी नवनाथ भागवत शेप (वय ४०) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. ३१ मे २०२६ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास नवनाथ शेप हे पाटील हॉस्पिटल परिसरातून जात असताना आरोपी दिनेश चव्हाण (रा. बंकटगल्ली, अंबाजोगाई) आणि त्याच्यासोबत असलेल्या इतर दोन अनोळखी इसमांनी त्यांना अडवले. आरोपींनी वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये हॉर्न वाजवल्याचा जाब विचारत शेप यांच्या उजव्या डोळ्यावर फायटरने प्रहार करून गंभीर दुखापत केली, तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेनंतर १ जून रोजी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस हवालदार आर्सुळ पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts