Breaking

माणुसकीला काळिमा; नराधम आजोबाकडून ३ वर्षांच्या नातीवर अत्याचार, केज पोलिसांकडून आरोपीला बेड्या

Updated: मे 2, 2026

By Vivek Sindhu

आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज तालुक्यातील युसूफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ५० वर्षीय नराधम आजोबाने स्वतःच्या ३ वर्षांच्या चिमुकल्या नातीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची अत्यंत संतापजनक आणि घृणास्पद घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलगी आपल्या आईसोबत उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी आली असताना, १६ एप्रिल ते २५ एप्रिल या कालावधीत नराधम आजोबाने तिच्यावर अनेकवेळा हे कुकर्म केले. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला १ मे रोजी रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित चिमुकलीला शारीरिक त्रास होऊ लागल्याने तिने आपल्या आईकडे घडलेला प्रकार सांगितला. आपल्याच वडिलांनी पोटच्या नातीसोबत असे अमानवीय कृत्य केल्याचे समजताच आईला मोठा धक्का बसला. याप्रकरणी युसूफवडगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ६४(२), ६५(२) आणि पोक्सो कायद्याच्या कलम ४ व ६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके यांनी तातडीने कारवाई करत संबंधित आरोपीला बेड्या ठोकल्या असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


Categories

Recent Posts