Breaking
Updated: एप्रिल 10, 2026
उसनवार दिलेले पैसे मागितल्याने मारहाण; सिरसाळा येथील घटना
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelपरळी: उसनवार दिलेले पैसे परत मागितल्याचा राग धरून एका व्यक्तीला दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना मोहा ते सिरसाळा शिवारात घडली आहे.
याप्रकरणी उज्जैन हरिभाऊ कावळे (वय ४३, रा. करेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. उज्जैन यांनी आरोपी ज्ञानेश्वर उर्फ राजेभाऊ गणेश देशमुख (रा. मांधवा) याला पैसे दिले होते. “तू माझे पैसे का परत देत नाहीस?” असे विचारल्याचा राग आल्याने ज्ञानेश्वर याने उज्जैन यांना शिवीगाळ केली आणि हातात दगड घेऊन त्यांच्या डाव्या गुडघ्यावर, उजव्या मांडीवर व छातीवर मारून गंभीर जखमी केले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. सिरसाळा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार तौर तपास करत आहेत.