Breaking
Updated: मे 25, 2026
धर्मापुरीत राजकीय वैमनस्यातून परस्परविरोधी तलवारी उपसल्या
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड: जिल्ह्यातील राजकीय वर्तुळातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. बीडमधील एका मोठ्या राजकीय पुढाऱ्याच्या जवळच्या आणि पंचायत समितीच्या माजी सभापतींच्या मुलाने एका विवाहित महिलेला ब्लॅकमेल करून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली असून पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अमर बांगर असे गुन्हा दाखल झालेल्या राजकीय पुढाऱ्याच्या मुलाचे नाव आहे.
मूळ बीड शहरातील चऱ्हाटा रोड भागातील रहिवासी असलेल्या आणि सध्या शहादा (जिल्हा नंदुरबार) येथे वास्तव्यास असलेल्या एका विवाहित महिलेने पोलिसांत न्याय मागितला आहे. फिर्यादीनुसार, आरोपी अमर बांगर याने पीडित महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेतला आणि तिच्यावर पाशवी अत्याचार केले. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने या अत्याचाराचे भांडवल करून पीडितेला सातत्याने ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. कुटुंबाची बदनामी करण्याची आणि पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी देत त्याने पीडितेकडे आणि तिच्या कुटुंबाकडे मोठ्या प्रमाणावर खंडणी मागितली. कौटुंबिक अब्रू वाचवण्यासाठी पीडितेच्या कुटुंबाने आरोपीला वेळोवेळी मोठी रक्कम दिली, मात्र पैशांची हाव आणि छळ थांबत नसल्याने अखेर पीडितेने पोलिसांकडे धाव घेतली.
या हायप्रोफाईल प्रकरणामुळे बीडच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपीचे वडील माजी पंचायत समिती सभापती असल्याने आणि त्याचे बीडमधील बड्या नेत्यांशी जवळचे संबंध असल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी बलात्कार, खंडणी आणि गुंगीचे औषध देऊन शोषण करणे या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपी अमर बांगर याच्या अटकेसाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. बीड जिल्हा गेल्या काही महिन्यांत राजकीय वरदहस्तामुळे वाढणाऱ्या गुन्हेगारीवरून आधीच चर्चेत असताना, आता थेट नेत्याच्या मुलाचा हा प्रताप समोर आल्याने पोलिसांच्या भूमिकेकडे आणि पीडितेला मिळणाऱ्या न्यायाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.