Breaking
Updated: मार्च 16, 2026
समाज गौरव पुरस्काराने सौ.रेखा तळणीकर सन्मानित
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई -: येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा संजय घोडावत आयआयटी अँड मेडिकल अकॅडमी च्या संचालिका सौ.रेखा अविनाश तळणीकर यांना जागतिक महिला दिनी कर्तुत्ववान महिला म्हणून समाज गौरव पुरस्काराने शाल, श्रीफळ, व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
लातूर येथील दशनाम गोसावी समाजाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात करण्यात आले होते. सौ. रेखा अविनाश तळणीकर या
इनरव्हील क्लब अंबाजोगाईच्या पदाधिकारी आहेत. संजय घोडावत आयआयटी अँड मेडिकल अकॅडमीच्या संचालिका
:- इनरव्हील क्लब म्हणून त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोठे काम केले आहे.अकॅडमी मार्फत हुशार व गरजू विद्यार्थ्यांना आतापर्यंत वीस लाख रुपये स्कॉलरशिप दिलेली आहे.
तसेच आयआयटी व मेडिकल अकॅडमीच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी आयआयटी व मेडिकलला लागलेली आहेत. इनरव्हील क्लब च्या माध्यमातून वैयक्तिक, गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षी गणवेश, शालेय साहित्य व आर्थिक मदत त्या करतात.
तसेच निराधार व गरजू महिलांना राशन कपडे व आर्थिक मदत हि दिली जाते.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.