Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

शेतातील तार कंपाउंडमुळे युवकाचा गेला जीव

Updated: फेब्रुवारी 3, 2026

By Vivek Sindhu

शेतातील तार कंपाउंडमुळे युवकाचा गेला जीव

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

गेवराई : तालुक्यातील राजापुर येथील शेतकऱ्याने शेतातील भुईमुगाचे वन्य प्राण्यांकडून नुकसान होऊ नये म्हणून तारेच्या कंपाऊंडमध्ये वीज प्रवाह सोडला. सदरील ठिकाणी चित्रे पकडण्यासाठी एक तरूण आला असता. त्याचा या कंपाऊंडला चिटकून मृत्यु झाल्याची घटना रविवार (दि.२५) रोजी घडली असून शेतकर्‍या विरोधात तलवाडा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

राजापुर येथील लक्ष्मण गोविंद जाधव यांनी आपल्या शेतामध्ये भुईमुगाची लागवड केली हेाती. भुईमुगाचे वन्य प्राण्यांनी नुकसान करू नये म्हणुन भुईमुगा भोवती असलेल्या कंपाऊंडमध्ये वीज प्रवाह सोडला. सदरील ठिकाणी योगेश उत्तम कचरे (वय २२) रा.भोगगाव ता.घनसांगवी जि.जालना हा तरूण चित्रे पकडण्यासाठी आला होता. त्याला तारेच्या कंपाऊंडला विद्युत पुरवठा असल्याचे माहित नसल्याने त्याला वीजेचा शॉक लागून त्याचा मृत्यु झाला.या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात सोमवार (दि.२) रोजी शेतकर्‍याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Categories

Recent Posts