Breaking
Updated: जून 25, 2026
हायवेवर डॉक्टर दांपत्याला अडवून पिस्तुलचा धाक; २.६० लाखांची सोन्याची चैन ओरबाडली
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड: बीडमध्ये धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर (NH 52) अज्ञात तीन दुचाकीस्वार भामट्यांनी एका डॉक्टर दांपत्याला गाठून, त्यांच्या पत्नीला धक्का देऊन पाडत गळ्यातील साडेसहा तोळ्यांची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पिस्तुलचा धाक दाखवून पळ काढला. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड येथील राजीव नगर भागात राहणारे डॉक्टर अजित तुकाराम जाधव हे २४ जून २०२१ रोजी दुपारी आपल्या पत्नीसह दुचाकीवरून नवीन कार पाहण्यासाठी हायवेवरील एका शोरूममध्ये गेले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास शोरूमवरून परत येत असताना गुरुकुल शाळेच्या समोर मागून एका विना नंबरच्या काळ्या दुचाकीवरून आलेल्या तीन तोंडाला रुमाल बांधलेल्या अज्ञात इसमांनी त्यांना थांबवले. एकाने डॉक्टरांच्या गळ्यातील चैन ओढण्याचा प्रयत्न केला. डॉक्टरांनी त्याचा हात पकडताच दुसऱ्या आरोपीने त्यांच्या पत्नीला जोरात धक्का देऊन खाली पाडले. पत्नीला सावरण्याच्या गडबडीत चोरट्यांनी २ लाख ६० हजार रुपये किमतीची सोन्याची जाड चैन हिसकावून पळ काढला. शिदोड रोडवरील पुलापर्यंत पाठलाग केला असता आरोपींनी पिस्तुल सारखी वस्तू रोखून धमकी दिली व ते पसार झाले. पोलीस निरीक्षक सोमनाथ मधुकर जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.