Breaking

बीड शहर ठाण्यात एसीबीचा सापळा; १० हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

Updated: जून 25, 2026

By Vivek Sindhu

बीड शहर ठाण्यात एसीबीचा सापळा; १० हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड: जिल्ह्यात प्रशासकीय लाचखोरीचे सत्र थांबता थांबेना झाले असून, आता थेट पोलीस ठाण्यातच लाच स्वीकारताना पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. बीड शहरातील शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. २५ जून) जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने एक मोठी कारवाई केली. यामध्ये एन.आय. ॲक्ट कलम १३८ अंतर्गत आलेली नोटीस तामिल करून देण्याच्या मोबदल्यात १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस अंमलदार सुशेन प्रकाश उगले याला रंगेहात पकडण्यात आले. या धक्कादायक कारवाईमुळे बीडच्या पोलीस वर्तुळात आणि जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या एका प्रकरणाशी संबंधित नोटीस बजावण्यासाठी पोलीस कर्मचारी सुशेन उगले याने १० हजार रुपयांची लाच मागितली होती. फिर्यादीची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी थेट जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या संदर्भात रीतसर तक्रार नोंदवली. जालना एसीबीच्या पथकाने गुरुवारी बीड शहर पोलीस ठाणे परिसरात अत्यंत गोपनीयतेने सापळा रचला आणि उगले याला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात दबोचले. सध्या संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, ही कारवाई जालना एसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. बीड जिल्ह्यात वारंवार बाहेरील जिल्ह्यांच्या एसीबी पथकांकडून होणाऱ्या कारवायामांमुळे स्थानिक यंत्रणेच्या पारदर्शकतेवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


Categories

Recent Posts