Breaking

संस्था, जनता आणि प्रशासन यांच्या समन्वयातून “ग्लोबल गाव” घडेल – जलनायक मयंक गांधी 

Updated: जून 26, 2026

By Vivek Sindhu

कृषीकुल येथे महसूल विभाग व तालुक्यातील सर्व पोलिस पाटील यांची व्यापक बैठक

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

कृषीकुल येथे महसूल विभाग व तालुक्यातील सर्व पोलिस पाटील यांची व्यापक बैठक

परळी – कृषीकुल शेतकरी प्रशिक्षण केंद्र, सिरसाळा येथे शुक्रवार (ता.26) रोजी आयोजित करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत तालुक्यातील सर्व गावांचे पोलिस पाटील, महसूल विभागाचे तलाठी, मंडळ अधिकारी तसेच विविध विभागांतील मान्यवर अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी “25 लक्ष वृक्ष लागवड आणि संवर्धन अभियान” तसेच “ग्लोबल गाव” स्पर्धेची सविस्तर माहिती देण्यात आली. बैठकीत वृक्ष लागवड ही केवळ एकदिवसीय मोहीम नसून लावलेल्या प्रत्येक रोपाचे संवर्धन, संरक्षण आणि जगविणे हीच अभियानाची खरी यशस्विता आहे, यावर विशेष भर देण्यात आला. प्रत्येक गावाने लोकसहभागातून वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारून पर्यावरण संवर्धनाबरोबरच जलसंधारण, जैवविविधता आणि शाश्वत ग्रामीण विकासासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी जलनायक मयंक गांधी यांनी ग्लोबल विकास ट्रस्टच्या विविध लोकाभिमुख उपक्रमांची माहिती देत, शेती, पाणी, पर्यावरण आणि ग्रामविकासाच्या क्षेत्रात सुरू असलेल्या कामांचा अधिकाधिक शेतकरी बांधवांना लाभ मिळावा, यासाठी प्रशासन आणि ग्रामस्तरावरील सर्व घटकांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले. मयंक गांधी म्हणाले, “वृक्ष लावणे ही सुरुवात आहे; पण त्या प्रत्येक वृक्षाला जगविणे हीच खरी सामाजिक जबाबदारी आहे. 25 लाख वृक्ष लागवड आणि संवर्धन अभियानातून प्रत्येक गावाने हरित विकासाचा संकल्प करावा. लोकसहभाग, प्रशासनाचे सहकार्य आणि ग्रामस्थांची जबाबदारी या त्रिसूत्रीच्या बळावर आपण पर्यावरण समृद्ध करण्यासोबतच भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित, समृद्ध आणि स्वावलंबी गावे घडवू शकतो.”

शुक्रवारी कृषीकुल येथे झालेल्या व्यापक बैठकीस डॉ.हरिश्चंद्र वंगे, माजी नायब तहसीलदार बाबुराव रूपनर, नायब तहसीलदार पंडित सुरवसे, तालुका कृषी अधिकारी अर्चना नागरगोजे, परळी ग्रामीण पोलीस निरीक्षक सय्यद मजहर आली, सिरसाळा पोलिस उप निरीक्षक राठोड बाबा भिलू यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. उपस्थितांनीही वृक्षसंवर्धन, ग्रामविकास आणि शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. तसेच 25 लक्ष वृक्ष लागवड आणि संवर्धन अभियान आणि ग्लोबल गाव स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रशासन व ग्रामपातळीवरील यंत्रणा पूर्ण सहकार्य करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.


Categories

Recent Posts