Breaking
Updated: जानेवारी 17, 2026
एटीएम कार्डची अदलाबदल करून ४० हजारांची फसवणूक
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो पकडला
माजलगाव : मांदोळा ते केसापुरी रोडवर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एका ७०९ टेम्पोवर माजलगाव ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ९ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस अंमलदार विठ्ठल श्रीराम नाना यांना मिळालेल्या माहितीनुसार, १६ जानेवारी रोजी पहाटे ३:३० वाजेच्या सुमारास केसापुरी फाट्याजवळ एक टेम्पो (एमएच ०४ सीए २४५६) अवैध वाळू घेऊन जात होता. पोलिसांनी या टेम्पोला अडवून तपासणी केली असता त्यात विनापरवाना चोरटी वाळू मिळून आली. पोलिसांनी ९ लाख रुपयांचा टेम्पो आणि १२ हजार रुपयांची वाळू असा एकूण ९ लाख १२ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. या प्रकरणी फुलेपिंपळगाव येथील आरोपी खालेक अनिस सय्यद विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार बडे अधिक तपास करत आहेत.