Breaking

नाळवंडी शिवारात लोखंडी रॉडने हल्ला; पानशॉप मालक जखमी

Updated: नोव्हेंबर 7, 2025

By Vivek Sindhu

नाळवंडी शिवारात लोखंडी रॉडने हल्ला; पानशॉप मालक जखमी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

गेवराई : नाळवंडी शिवारातील ढेकणमळ येथे ५ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास जुन्या वादातून ज्ञानेश्वर पंढरीनाथ अवघड (व्यवसाय पानशॉप, रहिवासी कोल्हेर, तालुका गेवराई) यावर लोखंडी रॉडने वार करून त्याला डोक्याला गंभीर जखम केली. आरोपीने लाथाबुक्क्या व चापटांनी मारहाण केली आणि धमकी देऊन ‘तुला जिवेच मारून टाकीन’ असा इशारा दिला, अशी फिर्यादीत तक्रार आहे.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार आरोपी क्रमांक १ कैलास रामभाऊ वाघमारे आणि आरोपी क्रमांक २ कविता प्रकाश वाघमारे (दोघे रहिवासी नाळवंडी) यांनी हे हल्ले केले. फिर्यादीला तसेच घटनास्थळी उपस्थित असलेल्या साक्षींना शिवीगाळ केल्याचे देखील तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.


Categories

Recent Posts