Breaking
Updated: सप्टेंबर 9, 2025
मोबाईलच्या ‘स्टेटस’चा वाद पेटला; तरुणाला बेदम मारहाण, तिघांविरोधात गुन्हा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelमाजलगाव : एकदरा शिवारातील शेतात मोबाईलवर ठेवलेल्या स्टेटसबाबत वाद निर्माण होऊन तरुणावर तिघांनी हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी रोहित भिमराव शिनगारे (वय १८, व्यवसाय मजुरी, रा. एकदरा, ता. माजलगाव, जि. बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पवन गुलाब घुंगासे, दीपक संतोष घुंगासे आणि आकाश उद्धव चाळक (सर्व रा. एकदरा, ता. माजलगाव, जि. बीड) यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
०५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास उद्धव चाळक यांच्या शेतात ही घटना घडली. पवन घुंगासे याने “तू सहा महिन्यांपूर्वी माझ्या नावाचे स्टेटस का ठेवले होते” असे कारण काढून फिर्यादीला बेल्टने पाठीवर, पायावर मारहाण केली. दीपक घुंगासे याने लाकडी काठीने मांडीवर प्रहार केला. तर आकाश चाळक याने चापट, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.
मारहाणीमध्ये फिर्यादी जखमी झाला असून उपचार घेतल्यानंतर त्याने ८ सप्टेंबर रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक देवकते करीत आहेत.