Breaking
Updated: सप्टेंबर 9, 2025
सालगडी शेतमालकाच्या घरातून ४० हजार रुपये घेऊन फरार
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelमाजलगाव : तुळजाभवानी मंदिरासमोर किरकोळ वादातून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. या प्रकरणी माजलगाव शहर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी राहुल नागुराव चव्हाण (वय ३०, व्यवसाय ड्रायव्हर, रा. जुना बाजार रोड, वडारवाडा, खाटीक गल्लीजवळ, माजलगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी कृष्णा तुकाराम निरडे, ऋषी बबन सुळ (दोघेही रा. कासारवाडा, माजलगाव) व एक अनोळखी इसम यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
०६ सप्टेंबर रोजी फिर्यादीने आरोपींना “मोटारसायकल बाजूला घ्या” असे सांगितल्याच्या रागातून आरोपींनी शिवीगाळ केली. फिर्यादीने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करताच ऋषी सुळ याने लोखंडी धारदार कत्तीने फिर्यादीच्या डाव्या हातावर वार करून गंभीर जखमी केले. कृष्णा निरडे याने फिर्यादीच्या डोक्यात कत्तीने प्रहार केला. तर एक अनोळखी इसम याने कत्ती फेकून मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.