Breaking
Updated: सप्टेंबर 8, 2025
सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelमाजलगाव : तालुक्यातील महातपुरी येथे रविवारी पहाटे झालेल्या घरफोडीत अज्ञात चोरट्याने सुमारे एक लाख पंचाहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी अनंत वामनराव कोलते (वय ५२, व्यवसाय शेती, रा. महातपुरी, ता. माजलगाव, जि. बीड) यांच्या फिर्यादीनुसार, ७ सप्टेंबर रोजी पहाटे सव्वा दोन ते सव्वा चारच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने घराच्या लोखंडी चॅनेल गेटचा कोंडा व कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाट फोडून त्यातून सोन्याचे दागिने व रोकड असा मिळून सव्वा लाख रुपयांचा माल चोरून नेला.
चोरलेल्या मुद्देमालामध्ये दोन सोन्याच्या मण्यांच्या मोत्यांच्या माळा, सोन्याचे झुंबर जोड आणि रोकड ४०,००० रुपये असा एकूण १,७५,००० रुपयांचा ऐवज आहे.
या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि चव्हाण करीत आहेत.