Breaking

पीक कर्जाच्या विवंचनेतून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

Updated: ऑगस्ट 21, 2025

By Vivek Sindhu

InShot 20250821 214024906

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज : वडिलांच्या नावे असलेले पीक कर्ज कसे फेडायचे या चिंतेतून नैराश्य आलेल्या अजय बापूराव थोरात (वय 29, रा. चिंचोली माळी, ता. केज) या तरुण शेतकऱ्याने गुरुवारी सकाळी 10 वाजता राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

थोरात यांच्या वडिलांच्या नावे दोन एकर शेती असून त्यावरून महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून दीड लाख रुपयांचे पीक कर्ज घेण्यात आले होते. पेरणीनंतर पावसाने घेतलेली ओढ आणि मागील काही दिवसांपासूनच्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत अजय थोरात नैराश्यात गेला होता.

नैराश्यातून त्याने घरातील लोखंडी आडूला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवन संपवले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सुकुमार उर्फ राकेश बनसोडे व बिट जमादार बाबासाहेब बांगर यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.


Categories

Recent Posts