Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाला प्रारंभ

Updated: नोव्हेंबर 28, 2025

By Vivek Sindhu

वर्णीने योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाला प्रारंभ

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

योगेश्वरी देवीचे पूजन करताना विलास तरंगे व मयुरी तरंगे

अंबाजोगाई – राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाला गुरुवारी (दि. २७) वर्णी देऊन प्रारंभ झाला.
देवल समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार विलास तरंगे व त्यांच्या पत्नी मयुरी तरंगे यांच्या हस्ते वर्णी देण्यात आली. पुरोहितांच्या मंत्रोच्चारात हा धार्मिक विधी व सप्तशतीचा पाठ झाला. यावेळी देवल समितीचे सचिव गिरधारीलाल भराडिया, कमलाकर चौसाळकर, पूजा कुलकर्णी, उल्हास पांडे, शिरीष पांडे, श्रीराम देशपांडे, प्रविण दामा यांच्यासह मानकरी उपस्थित उपस्थित होते.

वर्णी पूजनानंतर योगेश्वरीची आरती झाली. या महोत्सवात पुढील दहा दिवस सप्तशतीचा पाठ दररोज पुरोहित करतात. आष्टमी व नवमीला होमहवन होऊन पूर्णाहुती दिली जाते.

आराध महिलांची गर्दी

   मार्गशीर्ष नवरात्र महोत्सव हा या देवीचा उत्सव पारंपारिक पध्दतीने चालत आलेला आहे. याच उत्सवात नवस बोलणाऱ्या महिला देवीच्या मंदिरात आराध म्हणून बसतात,  त्यात कोणी १० कोणी, पाच तर कोणी तिन दिवस आराध बसतात. १० दिवस आराध बसणाऱ्या महिला वर्णीपूजनास उपस्थित राहून त्याच दिवशी आराध बसतात. त्यानुसार पहिल्याच दिवशी ५०० महिला देवीचे दर्शन घेऊन मंदिर परिसरात आराध बसल्या होत्या. 
     पुढील दहा दिवस योगेश्वरी मंदिरात महिलांचे भजन, कीर्तन, प्रवचन, संगीत गायन, वाघ्या मुरळी, देवीचा जागर करणारी आराधी गीते असे विविध कार्यक्रम होणार आहेत. मार्गशीर्ष पौर्णिमेला मंदिर परिसरात यात्राही भरते. याच दिवशी शहरात देवीच्या पालखीच्या मिरवणुकीने या महोत्सवाची सांगता होईल.

Categories

Recent Posts