Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

विशाल जाजू यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीड जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती

Updated: नोव्हेंबर 15, 2025

By Vivek Sindhu

विशाल जाजू यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीड जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई (प्रतिनिधी):- राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीड जिल्हा उपाध्यक्ष पदी अंबाजोगाई शहराचे युवा नेतृत्व विशाल विजयकुमार जाजू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष ऍड राजेश्वर चव्हाण यांनी राजकिशोर मोदी यांच्या शिफारशीनुसार विशाल जाजू यांना त्यांची बीड जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती केल्याचे नियुक्तीपत्र राजकीशोर मोदी यांच्या हस्ते नुकतेच देण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ना अजितदादा पवार यांचे व राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार बीड जिल्ह्यातील तळागाळातील नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार बीड जिल्हा अध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी सदरील नियुक्ती केली आहे.
विशाल जाजू हे माजी नगराध्यक्ष स्व विजयकुमार जाजू यांचे सुपुत्र असून त्याचा शहरातील सामाजिक , सांस्कृतिक क्षेत्रात मोठ्या हिरीरीने सहभाग दिसून येतो. अंबाजोगाई शहर तथा पंचक्रोशीत स्व विजयकुमार जाजू यांचा दांडगा जनसंपर्क होता. अंबाजोगाई शहरातील अनेक कुटुंब स्व विजयकुमार जाजू यांनी वसवली व स्थिरावली आहेत. विजयकुमार जाजू यांची व त्यांच्या कार्याची उजळण आजही अंबाजोगाई शहरात केल्या जात आहे. जाजू घराण्याची पुण्याई आजही त्यांच्या परिवारास मोठा आदर्श घालून देत आहेत. तीच परंपरा त्यांचे सुपुत्र विशाल जाजू हे पुढे चालवत आहेत.
अंबाजोगाई शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेस व राजकिशोर मोदी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. राजकिशोर मोदी यांचा अंबाजोगाई नगर परिषदेच्या माध्यमातून झालेला जनसंपर्क व विशाल जाजू यांचा कौटुंबिक वारसा हा अंबाजोगाई नगर परिषदेच्या निवडणुकीत मोठा करिष्मा दाखवू शकतो. महाराष्ट्र शासन व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध शासकीय व लोकाभिमुख योजना सामान्य मतदारांपर्यत पोचविण्यासाठी आपण प्रयत्न करावेत अशी अपेक्षाही विशाल जाजू यांच्या कडून पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. विशाल जाजू यांची बीड जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. विशाल जाजू यांना जिल्हा उपाध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र देताना राजकिशोर मोदी, माजी आमदार पृथ्वीराज साठे, प्रा महेंद्र आचार्य , सुभाष पाणकोळी, अनुप जाजू, अक्षय जाजू , बारगजे, बाबजे व विशाल जाजू , सुरेश साळवे यांचा मोठा मित्र परिवार उपस्थित होता.


Categories

Recent Posts