Breaking

विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे – नगराध्यक्षा सीता बनसोड

Updated: June 4, 2025

By Vivek Sindhu

विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे - नगराध्यक्षा सीता बनसोड

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा

Join Group

अंकुर स्वयंसेवी संस्था व उदयकाळ फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

केज – एकल महिला व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी खचून न जाता आपल्या आईची व कुटुंबांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी व स्वतःचा उदारनिर्वाह करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभा राहण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन मोठे व्हावे, आपल्या आई व कुटुंबाने केलेले कष्ट वाया न घालवता त्याचे फलित करावे, असे आवाहन केज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड यांनी केले.
केज येथे अंकुर स्वयंसेवी संस्था व उदयकाळ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक पालक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून नगराध्यक्षा सीता बनसोड या बोलत होत्या. कार्यक्रमास आंतरभारतीच्या आशा अमर हबीब, शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते कालिदास आपेट, मुबाशीर खतीब, तात्या गवळी, सामाजिक कार्यकर्त्या सविता आकुसकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
यावेळी अंकुर स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अनिता कांबळे यांनी संस्था ही मागील १५ वर्षांपासून केज, अंबाजोगाई तालुक्यासह बीड जिल्ह्यात एकल महिलासह आत्महत्याग्रस्त शेतकरी, एक पालक असणाऱ्या मुलांच्या विविध प्रश्नावर काम करीत आहे. तर २०२५ या शैक्षणिक वर्षात अशा आत्महत्याग्रस्त शेतकरी व एक पालक अशा ४० विद्यार्थ्यांचे संस्थेने पालकतत्व स्वीकारले असून त्यासाठी संस्थेला उदयकाळ फाउंडेशनचे पाठबळ मिळल्याची माहिती त्यांनी दिली.
सूत्रसंचालन तसलीम इनामदार यांनी तर आभार लक्ष्मण हजारे यांनी मानले. कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा राऊत, लता सावंत, रत्नमाला गायकवाड, शीला देवकर, अविनाश खरात यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.