Breaking
Updated: जानेवारी 8, 2026
गणेश जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई (प्रतिनिधी) – शहरातील श्री गणपती मंदिर ट्रस्ट, चौभारा यांच्याकडून दरवर्षी प्रमाणेच याही वर्षी गणेश जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यात गणेशयाग पालखी सोहळा काढण्यात येणार असून भाविक भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.
श्री गणपती मंदिर ट्रस्ट, चौभारा यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणेच याही वर्षी गणेश जयंतीनिमित्त २२ जानेवारी २०२६ रोजी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. याच्या नियोजन व तयारीसाठी मंगळवार रोजी श्री गणपती मंदिर ट्रस्ट, चौभारा यांचे पदाधिकारी व भाविक भक्त यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या व्यापक आणि सकारात्मक चर्चेतून प्रबोधनपर कार्यक्रम, गणेशयाग पालखी सोहळा साजरा करणे व भाविक भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यासंदर्भात सर्वानुमते ठरले. ज्यात कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विविध जबाबदाऱ्यांचे वाटप ही करण्यात आले. या बैठकीस विजयराव उमणवार, मन्मथअप्पा राऊत, शंकरराव भावठाणकर, शिरीष भावठाणकर, सुभाष सातभाई, शिवप्रसाद राऊत, दयानंद राऊत, शंकर सातभाई, उमाकांत राऊत, वामन भाऊ काळे, अशोक राऊत, नंदकिशोर देशमाने, प्रसाद देशमाने, उमाकांत देशमाने, शंभुलिंग राऊत, दयानंद दगडू राऊत, सुहास सातभाई, माऊली सातभाई, आत्मलिंग राऊत, सतिशराव राऊत, शिवलिंग राऊत, गणेश जाधव, गजानन घोडके, संदीप भावठाणकर, ओमकार धोत्रे, बबनराव शेटे, राहुल भावठाणकर, सत्यम राऊत, ओमकार राऊत, संगम देवशटवार, बाळकृष्ण देशमाने, शिवानंद राऊत, बालासाहेब राऊत, रमेश देशमाने, नागेश्वर राऊत, गोविंद राऊत, यश राऊत यांच्यासह सर्व भाविक भक्त, पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीचे सुत्रसंचालन श्री गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राम वसंतराव घोडके यांनी केले तर उपस्थितांचे आभार उपाध्यक्ष संदीप भावठाणकर यांनी मानले.