Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

मटका घेणारे दोघे पकडले ; सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त

Updated: जानेवारी 10, 2026

By Vivek Sindhu

प्रदीप फाटे याच्यावर गुन्हा दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज – केज शहरात आणि बोरीसावरगाव येथे पोलिसांनी छापा मारून मटका घेणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडील नगदी रक्कम, मोबाईल आणि दुचाकी असा १ लाख १७ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल करण्यात आला आहे. याप्रकरणी मटका बुक्की मालक गणेश खराडेसह दोन एजंटविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
केज शहरातील रेस्ट हाऊसच्या पाठीमागे मोकळ्या मैदानात कैलास लक्ष्मण गिरी (रा. समर्थनगर, केज) हा दुचाकीवर बसवून चालता फिरता मटका घेत असल्याच्या माहितीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे, फौजदार बालासाहेब रोडे, पोलीस नाईक त्रिंबक सोपणे यांच्या पथकाने ९ जानेवारी सायंकाळी ६.२० वाजेच्या सुमारास छापा मारला. पोलिसांनी कैलास गिरी यास पकडून त्याच्या नगदी रक्कम, दोन मोबाईल, दुचाकी असा ८५ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याने गणेश खराडे यास १० टक्के कमिशनवर मटक्याचा धंदा देत असल्याचे सांगितले. याप्रकरणी गणेश खराडे व कैलास गिरीविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
दुसरी कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांच्या आदेशावरून जमादार बालासाहेब डापकर, विकास चोपणे, राजू गुंजाळ, चंद्रकांत काळकुटे यांच्या पथकाने केली. त्यांनी बोरीसावरगाव (ता. केज) येथील समाधान पान टपरीवर मटका घेणाऱ्या गुणवंत आश्रुबा गायकवाड यास रंगेहाथ पकडून त्याच्याकडील नगदी २ हजार २५० रुपये व मोबाईल असा ३२ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याने ही गणेश खराडे यास १० टक्के कमिशनवर मटक्याचा धंदा देत असल्याचे सांगितले. याप्रकरणी गणेश खराडे, गुणवंत गायकवाड या दोघांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.


Categories

Recent Posts