Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

अंबाजोगाईकरांचा पाणीप्रश्न लवकरच सुटणार

Updated: जानेवारी 17, 2026

By Vivek Sindhu

७ कि.मी. नवीन पाईपलाईनची चाचणी यशस्वी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

७ कि.मी. नवीन पाईपलाईनची चाचणी यशस्वी

अंबाजोगाई: शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. आमदार नमिता अक्षय मुंदडा यांच्या विशेष पाठपुराव्यातून प्रगतीपथावर असलेल्या २०६ कोटी रुपयांच्या नवीन नळ पाणीपुरवठा योजनेचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आज यशस्वीपणे पूर्ण झाला. धनेगाव ते अंबाजोगाई दरम्यान टाकण्यात आलेल्या सुमारे ७ किलोमीटर लांबीच्या नवीन मुख्य जलवाहिनीची (पाईपलाईन) आज यशस्वी चाचणी पार पडली.

शहरातील वाढती लोकसंख्या आणि वारंवार उद्भवणारी पाणीटंचाई लक्षात घेता, अंबाजोगाईकरांना नियमित आणि मुबलक पाणी मिळावे यासाठी ही नवी योजना कार्यान्वित केली जात आहे. आमदार नमिता मुंदडा यांनी या योजनेसाठी शासनस्तरावर मोठा निधी उपलब्ध करून देत कामाचा सातत्याने पाठपुरावा केला होता. आज या ७ किलोमीटर पाईपलाईनमधून पाणी यशस्वीपणे प्रवाहित झाल्याने शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्याच्या दिशेने मोठे यश मिळाले आहे.

या महत्त्वपूर्ण विकासकामामुळे अंबाजोगाईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. या यशस्वी उपक्रमाबद्दल आणि नियोजित वेळेत काम मार्गी लावल्याबद्दल नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे. ही योजना पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर भविष्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


Categories

Recent Posts