Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

नवनिर्वाचित नगरसेवकास अर्वाच्च भाषा वापरणाऱ्या स्वच्छता निरिक्षकावर तात्काळ कार्यवाही करा

Updated: जानेवारी 19, 2026

By Vivek Sindhu

लोक विकास महाआघाडीचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

लोक विकास महाआघाडीचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

अंबाजोगाई (प्रतिनिधी) – लोक विकास महाआघाडीच्या नवनिर्वाचित नगरसेवकास अर्वाच्च भाषा वापरणाऱ्या स्वच्छता निरिक्षकावर तात्काळ कार्यवाही करा अशी मागणी लोक विकास महाआघाडीच्या वतीने सोमवार, दिनांक १९ जानेवारी रोजी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

अंबाजोगाई नगरपालिकेतील लोक विकास महाआघाडीचे नवनिर्वाचित नगरसेवक यांना त्यांनी शहरातील मुख्य रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या डिव्हायडरच्या आतील झाडांना पाणी टाकण्यात येत नाही व सदरील झाडे सुकुन जात आहेत. हा सार्वजनिक विषय मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांच्या निदर्शनास आणून दिला असता. यावेळी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात उपस्थित असलेले अंबाजोगाई नगरपरिषदेचे स्वच्छता निरिक्षक यांनी लोकनिर्वाचित नगरसेवक यांना आर्वाच्च भाषा वापरली व मुख्याधिकाऱ्यांच्या दालनातच त्यांना अपमानीत केले. या घटनेचा आम्ही जाहिर निषेध करीत आहोत. लोकप्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या नगरसेवक यांची अवमानना केल्याप्रकरणी संबंधित स्वच्छता निरिक्षक यांच्यावर आपल्या कार्यालयाच्या मार्फत तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी. कारण, सदरील स्वच्छता निरिक्षक हे त्यांची इतरत्र बदली झालेली असताना सदर बदली रद्द करून पुन्हा अंबाजोगाईत रूजू होतात. हे मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे आपल्या पदाचा गैरवापर करून त्यांनी वेळोवेळी वरिष्ठांचे न ऐकणे, स्वच्छता कामगारांना दमदाटी करणे आणि आता तर लोकनिर्वाचित नगरसेवकालाच आर्वाच्च भाषा वापरली आहे. त्यामुळे तात्काळ त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांची इतरत्र बदल करण्यात यावी. अन्यथा या प्रश्नी लोकविकास महाआघाडीच्या वतीने कायदेशीर बाबी तपासून योग्य ती भूमिका घ्यावी लागेल. याची आपण नोंद घ्यावी. असा इशारा लोक विकास महाआघाडीच्या वतीने निवेदक राजकिशोर मोदी (नगरसेवक तथा प्रमुख – लोकविकास महाआघाडी), बबनराव लोमटे (नगरसेवक, न.प.अंबाजोगाई), दिनेश भराडीया (उपनगराध्यक्ष, न.प.अंबाजोगाई), सय्यद ताहेर भाई (गटनेता, लोक विकास महाआघाडी, न.प.अंबाजोगाई.), ज्येष्ठ नगरसेवक हाजी इस्माईल हिरू गवळी, महेश बालासाहेब लोमटे, ऍड.विकास रामकृष्ण काकडे, महेश बाळासाहेब कदम, आकाश जिवनराव कराड, राजपाल संभाजी जावळे, नजीर उमरदराजखान पठाण, मालू भगवान जोगदंड, नाजनीन बेगम अकबरखॉं पठाण, शेख शिरीन अशफाक, सौ.जयश्रीताई पृथ्वीराज साठे, सौ.श्रुतीताई अमोलराव लोमटे, सौ.दिपाताई बबन ऊर्फ दाजीसाहेब लोमटे, सौ.संगिताताई दाजीसाहेब लोमटे, शेख शमीम शेख रहीम, सौ.रेखाताई विलास जाधव, बशीरा शफीक सय्यद, सौ.सोनीताई दत्तात्रय सरवदे आदी नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदन देताना लोक विकास महाआघाडीचे अमोल लोमटे, रौफभाई बिल्डर, मोईनभाई शेख, सचिन जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.


Categories

Recent Posts