Breaking
Updated: नोव्हेंबर 10, 2025
प्रभाग क्र. 12 मधून शेख कलीम शेख सलीम यांची प्रबळ दावेदारी
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई शहरातील वातावरण सध्या पूर्णपणे निवडणुकामय झाले आहे. नगर परिषद निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसा प्रत्येक प्रभागात स्थानिक नेतृत्वाबाबत चर्चा सुरू झाली आहे. प्रभाग क्र. 12 मध्ये या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत यूवा उद्योजक शेख कलीम शेख सलीम. समाजकारण, जनसंपर्क आणि युवकांना रोजगाराच्या दिशेने प्रेरित करण्याच्या त्यांच्या कार्यामुळे ते या उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार ठरत आहेत.
शेख कलीम हे आधार उद्योग समूहाचे सर्वेसर्वा असून, व्यावसायिक क्षेत्रात त्यांनी यशस्वी कारकीर्द घडवली आहे. औषधी क्षेत्रातील उत्तम व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख आहे. व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी अनेक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध दिल्या आहेत. सामाजिक भान जपत त्यांनी गरजू रुग्णांना औषधोपचार, रक्तदान शिबिरे, आणि वैद्यकीय मदत पुरवण्याचे अनेक उपक्रम राबवले आहेत.
शेख कलीम हे केवळ व्यावसायिक नाहीत तर सामाजिक प्रश्नांवर भूमिका घेणारे कार्यकर्ते आहेत. अंबाजोगाईत झालेल्या शाहीन बाग आंदोलनात त्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला होता. तसेच जिल्हा निर्मितीच्या आंदोलनातही त्यांची भूमिका लक्षणीय होती. त्यामुळे सामाजिक, नागरी आणि राजकीय प्रश्नांबद्दल त्यांची जिज्ञासा स्पष्टपणे दिसून येते. सर्वधर्मीय संभाव जपणाऱ्या शेख कलीम यांनी जात, धर्म किंवा पक्ष विचार न पाहता अडी-अडचणीत असलेल्या नागरिकांना मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे प्रभागातील तरुण वर्ग त्यांच्या मागे ठामपणे उभा आहे. शेख कलीम यांनी रोजगाराभिमुख उपक्रम, कौशल्य विकास प्रशिक्षण आणि उद्योजकता वाढविण्याचे अनेक कार्यक्रम राबविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे प्रभाग 12 मध्ये त्यांच्या माध्यमातून यंदा नव्या नेतृत्वाला संधी अशी आशा स्थानिक नागरिकांना आहे.
शेख कलीम यांनी निवडून आल्यास सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य शिबिरे, तरुणांसाठी खुली व्यायामशाळा उभारण्याचा आणि या प्रभागातील विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा मानस व्यक्त केला आहे. तसेच, प्रभागात संपर्क कार्यालयाची स्थापना करून या कार्यालयातून नागरिकांना शासकीय योजनांची माहिती, अर्ज प्रक्रियेतील मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष साहाय्य मिळेल, अशी त्यांची भूमिका आहे. प्रभागातील आबालवृद्धांमध्ये त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक उत्सुकता आहे. त्यांच्या विनम्र वर्तनामुळे आणि तत्पर सेवाभावामुळे अनेक नागरिक त्यांना सक्षम पर्याय मानत आहेत. अंबाजोगाई नगर परिषदेच्या प्रभाग क्र. 12 मधील उमेदवारीच्या स्पर्धेत समाजभान आणि सामाजिक सलोखा जोपासणारे शेख कलीम शेख सलीम हे सर्वात प्रभावी आणि सर्वमान्य उमेदवार ठरू शकतात अशी चर्चा रंगत आहे.