Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

शेतात कापूस वेचणाऱ्या विवाहितेचा विनयभंग

Updated: जानेवारी 20, 2026

By Vivek Sindhu

शेतात कापूस वेचणाऱ्या विवाहितेचा विनयभंग

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

गौतम बचुटे/केज :-  शेतात कापूस वेचणी करीत असलेल्या एका विवाहित महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना धारूर तालुक्यात घडली आहे.

रविवार दि. १८ जानेवारी रोजी धारूर तालुक्यातील चिंचपूर शिवारात विवाहित महिला आणि तिची जाऊ या दोघी शेतात कापूस वेचणी करीत होत्या. त्या वेळी अर्जुन महादेव घुगे हा तेथे आला. त्याने पीडित महिलेचा वाईट हेतूने पदर धरला आणि तिच्याशी झटापट करून विनयभंग केला. या अचानक झालेल्या प्रकारामुळे महिला प्रचंड घाबरली. 

पीडित महिलेने या घटने नंतर तत्काळ युसूफवडगाव पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. तिच्या तक्रारी वरून अर्जुन घुगे याच्या विरुद्ध गु. र. नं. १७/२०२६ भा. न्या. सं. ७४, ७५, ३५२ नुसार युसुफवडगाव पोलिस विनयभंगाचा गुन्हा नोंदवला आहे. प्रभारी अधिकारी, सहायक पोलिस निरीक्षक मच्छिंद्र शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार केशव खाडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts