Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

शेतकरी हक्क प्रश्नी किसान सभा पूर्ण पाठीशी

Updated: डिसेंबर 25, 2025

By Vivek Sindhu

शेतकरी हक्क प्रश्नी किसान सभा पूर्ण पाठीशी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

हमीभाव प्रश्न आंदोलनास किसान सभेचा पाठींबा

बीड – अखिल भारतीय किसान सभा सातत्याने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर जिल्ह्यात आवाज उठवत आलेली आहे.याच पद्धतीने विद्यमान परिस्थितीत शेतकरी हक्क मोर्चा सुद्धा शेतकऱ्यांचा प्रश्न हाती घेऊन शेतकरी हक्क मोर्चा आयोजित केलेला आहे. या मोर्चास अखिल भारतीय किसान सभा बीडच्या वतीने संपूर्ण सक्रिय पाठिंबा असल्याची माहिती जिल्हा किसान सभेने दिली आहे. 

सरकारचे धोरण शेतकऱ्यांप्रती दिवसेंदिवस उदासीन व अडचणीचे होत असताना शेतकऱ्यांच्या न्याय हक्काचा लढा पुढे घेऊन जाण्यासाठी शेतकऱ्यांची संपूर्ण एकजूट महत्वाची आहे. त्या अनुषंगाने अखिल भारतीय किसान सभा सातत्याने शेतकरी लढा लढत आली आहे आणि अशा लढ्यांना बळ देण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकरी हक्क मोर्चा कडून कापूस, सोयाबीन व तूर, उत्पादन खर्च व भाव वाढीचे आंदोलन हाती घेतले आहे. कापूस आणि सोयाबीन शेत मालाची खरेदी हमीभावाने खरेदी करताना जाचक अटी टाकून केंद्र आणि राज्य सरकारने बाजार पेठेतील शेत मालाच्या समतोल राखण्यापेक्षा, शासकीय हमीभावाने खरेदी करण्यास सरकार असमर्थ असल्याने हमीभावाने खरेदी टाळण्यासाठी जाचक अटी घालत आहे. उत्पादन खर्चापेक्षा कमी भावात खुल्या बाजारात व्यापा-याकडे विक्री करण्याचे हे षडयंत्र सरकार करत असून शासकीय खरेदी करताना येणाऱ्या अडचणी दूर करून कापूस, सोयाबीन शेतमाल हमीभावाने खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अथवा या संघर्षाला व एकजुटीला व्यापक स्वरूप देऊन सर्वच शेतकरी संघटना एकत्र येऊन परस्पर सहकार्य करावे लागणार आहे. शेतकऱ्यांची एकजूट पुढे घेऊन जाऊन सरकारच्या कोपराला गुळ लावणाऱ्या योजना त्या कशा शेतकऱ्यांच्या आवाक्यात येतील, तसेच त्याने गाळलेल्या घामाला कसा योग्य दाम मिळेल याच्यासाठी लढावे लागणार आहे. आपल्या या शेतकरी हक्क मोर्चास बीड जिल्हा अखिल भारतीय किसान संपूर्ण पाठिंबा देत असल्याची माहिती किसान सभेचे नेते कॉ.अजय बुरांडे यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते


Categories

Recent Posts