Breaking

रेल्वे पुलाखाली शिपायाला गाठून २३ हजारांची रोकड लुटली; चार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल

Updated: जून 23, 2026

By Vivek Sindhu

रेल्वे पुलाखाली शिपायाला गाठून २३ हजारांची रोकड लुटली; चार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड: शहरातील बार्शी नाका ते छत्रपती संभाजी महाराज चौक दरम्यान असलेल्या रेल्वे पुलाखाली एका शिपायाला मारहाण करून २३ हजार रुपयांची रोकड बळजबरीने लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना १६ जून २०२६ रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी २२ जून रोजी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात चार अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेठ बीड भागातील विप्रोनगर येथे राहणारे आणि शिपाई म्हणून कार्यरत असलेले राधेश्याम नंदलाल पारीख (वय ४२) यांनी या संदर्भात रीतसर फिर्याद दिली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राधेश्याम पारीख हे हॉटेल पालीहील येथून जेवण करून रात्रीच्या वेळी बीड शहराकडे परतत होते. ते रेल्वे ब्रीजच्या खालून जात असताना अचानक आलेल्या चार अज्ञात व्यक्तींनी त्यांना रस्त्यात अडवले. काही समजण्याच्या आतच आरोपींनी पारीख यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्या खिशातील ५०० रुपये दराच्या ४६ नोटा असलेली एकूण २३ हजार रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेऊन चोरटे अंधाराचा फायदा घेत पसार झाले. या घटनेमुळे परिसरात रात्रीच्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बीड ग्रामीण पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(६) अन्वये गुन्हा नोंदवला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts