Breaking
Updated: जून 24, 2026
सामाजिक कार्यकर्ते अक्षय जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर; 55 रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्ते अक्षयभैय्या जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त अंबाजोगाई येथील पुत्रेश्वर महादेव मंदिर येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात 55 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले.
शहरातील विविध सामाजिक संस्था, युवक मंडळे आणि नागरिकांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. रक्तदान हे श्रेष्ठदान असून गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रक्ताची नितांत आवश्यकता असते, असे प्रतिपादन यावेळी वक्त्यांनी केले.
शिबिरात युवकांसह ज्येष्ठ नागरिकांनीही सहभाग घेत रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित केले. रक्तदात्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
अक्षय जाधवभैय्या यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणार्या सर्वांचे आभार मानत, सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजसेवेचा वसा पुढेही कायम ठेवणार असल्याचे सांगितले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मित्र परिवारांनी विशेष परिश्रम घेतले. रक्तदान शिबिरामुळे गरजू रुग्णांना मदत होणार असून, वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करण्याच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.