Breaking

सर्पदंशाने सख्या भावंडांचा दुर्दैवी मृत्यू

Updated: May 24, 2025

By Vivek Sindhu

सर्पदंशाने सख्या भावंडांचा दुर्दैवी मृत्यू

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा

Join Group

धारूर : धारूर तालुक्यातील कोयाळ गावात एक हृदयद्रावक घटना घडली असून, सर्पदंशामुळे एका कुटुंबातील सख्या भावंडांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना २४ मे रोजी मध्यरात्री १२ ते १ वाजताच्या सुमारास प्रदीप मधुकर मुंडे यांच्या राहत्या घरी घडली.

प्रदीप मुंडे यांची सात वर्षांची मुलगी कोमल आणि पाच वर्षांचा मुलगा शिवम हे रात्री झोपेत असताना त्यांच्या अंगावर साप आला व त्याने दोघांनाही दंश केला. दंशानंतर दोन्ही चिमुकल्यांची तब्येत अचानक बिघडली. तातडीने उपचारासाठी त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच दोघांनीही प्राण सोडले.

या घटनेमुळे संपूर्ण कोयाळ गावावर शोककळा पसरली असून, मुंडे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सर्पदंशामुळे एका घरातील दोन निष्पाप जीवांचा गेलेला बळीमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.