Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

प्रभाग क्र.०४ मध्ये आ. नमिता मुंदडा यांची कॉर्नर बैठक

Updated: नोव्हेंबर 22, 2025

By Vivek Sindhu

प्रभाग क्र.०४ मध्ये आ. नमिता मुंदडा यांची कॉर्नर बैठक

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

कांताबाई पोखरकर, हनुमंत तौर यांना वाढता प्रतिसाद

अंबाजोगाई( प्रतिनिधी) – अंबाजोगाई नगरपरिषदेच्या निवडणूकीत भाजप प्रणित शहर जन परिवर्तन आघाडीच्या सौ.कांताबाई सिद्राम पोखरकर यांची प्रभाग क्र.०४ मधून अधिकृत उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे प्रभागात आनंद व्यक्त होत असून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा,आ. नमिता मुंदडा यांनी सर्वांगीण विचार करून सौ.कांताबाई सिद्राम पोखरकर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. या घोषणेनंतर रविवार पेठ, धनगर गल्ली, रामकृपा वसाहत खडकपुरा देशपांडे गल्ली या भागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून,पोखरकर समर्थक आणि भाजप आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोर्चेबांधणीला वेग आणला आहे. प्रभाग क्र.०४ मध्ये कॉर्नर बैठक संपन्न झाली त्यात आ. नमिता मुदंडा यांनी अंबाजोगाई नगर परिषद ही नागरिकांच्या विकासासाठी कटीबध्द असून रस्ते,वीज,पाणी स्वच्छता या मुलभूत गरजा पुरविणे गरजेचे असते पण मागील काळात त्या पुरविल्या नाहीत त्यात अनियमितता आली. पुढील काळात स्वच्छ सुंदर अंबाजोगाईसाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नंदकिशोर मुंदडा, प्र.०४ मधील उमेदवार कांताबाई पोखरकर, हनुमंत तौर यांना विजयी करण्याचे आवाहन आ.मुंदडा यांनी केले. उमेदवार कांताबाई पोखरकर व सामाजिक कार्यकर्ते विनोद पोखरकर यांनी या भागातील महिला, नागरिक, युवक यांच्या जोरदार भेटीगाठी सुरू केल्या आहेत. प्रचार दौऱ्यात भाजप पदाधिकारी नातेवाईक इतर युवक, मित्र परिवार, कार्यकर्ते बरोबर असून पोखरकर परिवाराचा प्रभाग क्र. ०४ मध्ये भक्कम जनसंपर्क असून सौ. कांताबाई पोखरकर यांना भरभरून प्रतिसाद मताद्वारे दिसेलच असे प्रकर्षाने जाणवत आहे. चिन्ह वाटप २६ तारखेला होणार असून त्यानंतर प्रचार अधिक वेगाने सुरू होईल सौ. कांताताई पोखरकर यांच्या माध्यमातून महिलांचे संघटन, नवरात्रातील सामाजिक उपक्रम यांसारख्या कार्यक्रमांमुळे त्यांची लोकाभिमुख ओळख भक्कम झाली आहे. शिवाय विनोद पोखरकर यांच्याही तत्परतेच्या सामाजिक कार्यामुळे त्यांच्याकडे प्रभागातील विकासाचे दूरदर्शी नेतृत्व म्हणून पाहिले जात असल्याची चर्चा जनमानसात आहे. सौ. कांताताई पोखरकर ह्या प्रचार कार्यात सध्या आघाडीवर असून प्रभाग क्र. ०४ खडकपुरा मधून त्यांचा विजय निश्चित असल्याची
राजकीय वर्तुळात चर्चा आहे.


Categories

Recent Posts