Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

राजकिशोर मोदी, माजी आमदार पृथ्विराज साठे यांचा प्रभाग ७ मध्ये झंजावाती प्रचार

Updated: नोव्हेंबर 22, 2025

By Vivek Sindhu

राजकिशोर मोदी, माजी आमदार पृथ्विराज साठे यांचा प्रभाग ७ मध्ये झंजावाती प्रचार

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

नागरिकांच्या घरोघरी जाऊन केले सौ.संगीता दिलीप काळे व मनोजभाऊ लखेरा यांना विजयी करण्याचे आवाहन

अंबाजोगाई (प्रतिनिधी) अंबाजोगाई नगरपरिषदेची निवडणूक आता जनतेनेच हातात घेतली आहे. लोक विकास महाआघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजकिशोर मोदी व माजी आमदार पृथ्विराज साठे यांनी शनिवारी प्रभाग ७ मध्ये झंजावाती प्रचार करून नागरिकांच्या गाठीभेटी घेत घरोघरी जाऊन सौ.संगीताताई दिलीप काळे व मनोजभाऊ लखेरा यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

प्रारंभी लोक विकास महाआघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजकिशोर मोदी व माजी आमदार पृथ्विराज साठे यांनी प्रभाग ७ मधील अधिकृत उमेदवार सौ.संगीताताई दिलीप काळे व मनोजभाऊ लखेरा यांच्यासह दिलीपराव काळे, माणिक वडवणकर, डाॅ.राजेश इंगोले, संतोष काळे, सुनिल वाघाळकर, धनंजय काळे, सुशील जोशी, शुभम लखेरा यांच्यासह प्रमुख नेते व कार्यकर्ते यांनी विश्वरत्न महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. लोक विकास महाआघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजकिशोर मोदी यांनी प्रभाग ७ मधील अधिकृत उमेदवार सौ.संगीताताई दिलीप काळे व मनोजभाऊ लखेरा यांच्यासह प्रमुख नेते, प्रभागातील मान्यवर, कार्यकर्ते, युवक, महिला भगिनी या प्रभागातील आपल्या सहकारी उमेदवारांना घेऊन मतदारांच्या प्रत्यक्ष घरोघरी जाऊन त्यांच्या गाठीभेटी घेत प्रचाराची राळ उडवून दिली. शनिवार, दि २३ नोव्हेंबर रोजी प्रभाग क्रमांक ७ मधून मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या व प्रभागातील सर्व मतदारांना सहकार्य करण्याचे व मतदानरूपी आशिर्वाद देण्याचे आवाहन राजकिशोर मोदी व त्यांच्या सहकारी उमेदवारांनी मतदारांना केले. याप्रसंगी राजकिशोर मोदी यांच्या समवेत प्रभाग क्रमांक ७ मधील अनेक सहकारी उपस्थित होते. प्रभागातील या भेटी दरम्यान राजकिशोर मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांचे मतदारांकडून उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर जागोजागी सुवासिनींकडून औक्षण देखील करण्यात आले. यावरून राजकिशोर मोदी यांच्या प्रति मतदारांचा मोठा विश्वास, आपुलकी व प्रेम दिसून आले. अंबाजोगाई शहर हे मोदींच्या अनुभवी व विकसनशिल नेतृत्वाला मानणारे शहर आहे. त्यांच्याच सहकार्य व आशीर्वादाने मोदी हे मागील अनेक वर्षे अंबाजोगाई नगर परिषदेच्या माध्यमातून शहरवासीयांची सेवा करीत आहेत. अंबाजोगाई नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचारादरम्यान मोदी हे त्यांनी आजपर्यंत केलेल्या विकासकामांच्या बळावरच यापुढेही मतदानरूपी आशिर्वाद मागत आहेत. अंबाजोगाई शहर हे एक कुटुंब म्हणून आपण काम केले आहे. येथील नागरिकांनी देखील नेहमीच आम्हाला भक्कम अशी साथ दिलेली आहे. यापुढेही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पापा मोदी व त्यांच्या संपूर्ण सहकार्यांना पाठबळ देण्याचे आवाहन या प्रचारादरम्यान राजकिशोर मोदी सर्व मतदारांना करीत आहेत. मतदार देखील खंबीरपणे लोक विकास महाआघाडीच्या पाठीशी उभे राहण्याचे अभिवचन देत आहेत. शहरातील मतदार नवयुवक, महिला व जेष्ठ नागरिक यांच्याकडून मिळत असलेले प्रेम, आशिर्वाद, विश्वास पाहून मोदी व त्यांचे सहकारी प्रभाग क्रमांक ७ मधील लोकविकास महाआघाडीचे उमेदवार सौ.संगीताताई दिलीप काळे व मनोजभाऊ लखेरा भारावून गेले.


Categories

Recent Posts