Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

प्रभाग क्र. १० मध्ये अक्षय मुंदडा यांची भव्य प्रचार फेरी; नंदकिशोर मुंदडा, रचना परदेशी व वाजेद खतीब यांना उत्साहवर्धक प्रतिसाद

Updated: नोव्हेंबर 20, 2025

By Vivek Sindhu

नंदकिशोर मुंदडा, रचना परदेशी व वाजेद खतीब यांना उत्साहवर्धक प्रतिसाद

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई : नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर अंबाजोगाई शहर परिवर्तन जनविकास आघाडीच्या उमेदवारांची भव्य प्रचार फेरी बुधवारी प्रभाग क्रमांक १० मधून उत्साहात पार पडली. आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नंदकिशोर मुंदडा, नगरसेवक पदाचे उमेदवार रचना परदेशी आणि वाजेद खतीब यांच्या प्रचारार्थ युवा नेते अक्षय मुंदडा रॅलीत सहभागी झाले.

प्रचार फेरीदरम्यान नूरानी चौक सीमेंट रोड, पोस्ट ऑफिस मागील परिसर, खंडोबा मंदिर परिसर, सिद्धार्थ नगर, गुरुवार पेठ, चांभार गल्ली, हमाल गल्ली, मंगळवार पेठ आणि हावळे गल्ली या भागांत उमेदवारांनी घर-घर भेट देत मतदारांशी संवाद साधला. नागरिकांच्या अपेक्षा, प्राधान्याच्या समस्या आणि विकासासंबंधी आवश्यक गरजांवर चर्चा झाली. यावेळी मुंदडा कुटुंबाच्या माध्यमातून शहरात झालेल्या विकासाचा आढावा अक्षय मुंदडा यांनी मतदारांसमोर मांडला.

रचना परदेशी उच्चशिक्षित असून सामाजिक कार्यात सक्रिय रस घेणाऱ्या तरुण उमेदवार म्हणून मतदारांशी परिचित होत आहेत. वाजेद खतीब यांनी यापूर्वी केलेल्या नगरसेवक पदावरील कामगिरीमुळे त्यांच्या अनुभवाची नोंद नागरिक घेत असल्याचे दिसले. दोन्ही उमेदवार कार्यक्षम असल्याचा प्रभाव मतदारांवर दिसून आला.

मतदारसंघातील पायाभूत सुविधा, परिसराचा सर्वांगीण विकास, नागरिकांसाठी सुकर प्रशासन आणि पारदर्शक कारभार याबाबत आघाडीच्या उमेदवारांनी आपले विचार मतदारांसमोर मांडले. शहराच्या परिवर्तनासाठी जनविकास आघाडीस मतदान करावे अशी विनंती अक्षय मुंदडा, रचना परदेशी आणि वाजेद खतीब यांनी केली. या रॅलीत स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Categories

Recent Posts