Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

लोकशाहीचा जागर ! महिलांनी रांगोळीतून केली जनजागृती

Updated: नोव्हेंबर 22, 2025

By Vivek Sindhu

रोटरी क्लब व नगरपरिषदेचा उपक्रम

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

रोटरी क्लब व नगरपरिषदेचा उपक्रम

अंबाजोगाई -: आपले मत आपला अधिकार, चला करूया मतदान, असे रांगोळीच्या माध्यमातून विविध संदेश देत महिलांनी अंबाजोगाईत रांगोळ्यांच्या माध्यमातून मतदार जनजागृती केली.
येथील रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी व नगर परिषद, यांच्या वतीने शुक्रवारी दुपारी नगर परिषदेच्या योगेश्वरी उद्यानात नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृती साठी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत ४० महिलांनी आकर्षक रांगोळ्यातून मतदार जनजागृतीचा संदेश दिला. या रांगोळी स्पर्धेचे परीक्षण जया मुडेगावकर व लक्ष्मण काटे यांनी केले.विजेत्या स्पर्धकांना
उपजिल्हाधिकारी दिपक वजाळे, तहसीलदार तरंगे,मुह्याधिकारी प्रियंका टोंगे, रोटरीच्या अध्यक्षा प्रा. रोहिणी पाठक, रोटरॅक्ट अध्यक्षा विशाखा बजाज, दिलीप तांबरे व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
रांगोळ्यांमध्ये “मतदान आपले कर्तव्य, राष्ट्रीय हित आपले ध्येय”, “माझे मत माझे भविष्य” अशा प्रभावी संदेशांचे रेखाटन करण्यात आले होते. या संदेशांद्वारे महिलांनी नागरिकांना निर्भीडपणे, जबाबदारीने आणि सजगपणे मतदान करण्याचे आवाहन केले. रांगोळ्या पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी केली होती. या उपक्रमामुळे आगामी निवडणुकीत मतदारांमध्ये आणखी उत्साह निर्माण होईल, अशी अपेक्षा रोटरी क्लबच्या अध्यक्षा प्रा रोहिणी पाठक यांनी व्यक्त केली. यावेळी नगर परिषदेचे अधिकारी,कर्मचारी व रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते.


Categories

Recent Posts