Breaking
Updated: जानेवारी 8, 2026
साळेगांव येथे नजरअली बाबा उर्फ मोहरील बाबा दर्गा उरूस संपन्न
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelगौतम बचुटे/केज :- साळेगांव ता. केज येथील हिंदू-मुस्लिम धर्मियांचे श्रद्धास्थान नजरअली बाबा उर्फ मोहरील बाबा दर्गा यांचा उरूस साजरा करण्यात आला.
परिसरातील आणि बाहेर राज्यातील हिंदू-मुस्लिम धर्मियांचे श्रद्धास्थान नजरअली बाबा उर्फ मोहरील बाबा यांचा मृत्यू सन २०१४ मध्ये झाला. त्या नंतर त्यांच्यावर श्रद्धा असलेले हैदराबाद येथील मजीद भाई, साऊथ भाई आणि त्यांचे कुटुंबीय हे मागील १२ वर्षा पासून उरूस भरवितात. उरूस निमित्त या परिसरात सजावट आणि मनमोहक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे.
दि. ८ जानेवारी नजर अली बाबा उर्फ मोहरील बाबा दर्गा उरूस यांचा उरूस नजरअली उर्फ जानिरोद्दीन काझी ज्यांना परिसरात मोहरील बाबा म्हणून ओळखले जात होते त्यांच्या घरातून सुरुवात झाली. या उरूस मध्ये हिंदू, मुस्लिम बांधवसह अनेकजण सहभागी झाले होते.
या वेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे, पोलिस उपनिरीक्षक राकेश बनसोडे, पोलिस उपनिरीक्षक इनामदार, माजी पंचायत समिती सदस्य हाजी सय्यद नवाब मामू, माजी सरपंच हाजी नूर मामू, रवींद्र जोगदंड, संभाजी सरवदे, पत्रकार संतोष गालफाडे, गौतम बचुटे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब बांगर, मास्टर जावेदभाई, प्रा. शेख अहेमद, नजीर अली बाबा यांचे चिरंजीव समियोद्दीन काझी आणि मुलगी फईम बेगम हे उपस्थित होते.