Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

प्रभाग ९ मध्ये जनविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ आ. नमिता मुंदडा यांच्या रॅलीला जोरदार प्रतिसाद

Updated: नोव्हेंबर 20, 2025

By Vivek Sindhu

आ. नमिता मुंदडा यांच्या रॅलीला जोरदार प्रतिसाद

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

नंदकिशोर मुंदडा, सविता लोमटे, कमलाकर कोपले यांना विजयी करण्याचे केले आवाहन

अंबाजोगाई : नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मध्ये अंबाजोगाई शहर परिवर्तन जनविकास आघाडीचा प्रचार वेग घेत आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नंदकिशोर मुंदडा यांच्यासोबत प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार सविता लोमटे आणि कमलाकर कोपले यांच्या विजयासाठी आमदार नमिता मुंदडा गुरुवारी मोठ्या रॅलीतून मतदारांच्या भेटीसाठी उतरल्या.

या दोन्ही उमेदवारांनी यापूर्वी अंबाजोगाई नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष पद भूषविले असून प्रशासनिक अनुभव, कार्यतत्परता आणि प्रभागातील विकासकामांसाठी त्यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे त्यांच्याबद्दल मतदारांमध्ये चांगला विश्वास आहे. रॅलीदरम्यान या अनुभवी आणि कर्तबगार उमेदवारांना नागरिकांचा उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला.

प्रचाराचा शुभारंभ हाउसिंग सोसायटी येथील सुपारी हनुमान मंदिरात नारळ फोडून करण्यात आला. त्यानंतर हाउसिंग सोसायटी, बन्सीलाल नगर, ज्ञानेश्वर नगर, विद्याकुंज कॉलनी, ओमशांती कॉलनी आणि फुले नगर या भागांत आमदार नमिता मुंदडा, सविता लोमटे, कमलाकर कोपले आणि कार्यकर्त्यांनी घर-घर भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला.

स्थानिक पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वसाहतींची प्रगती आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणी या विषयांवर व्यापक चर्चा झाली. अंबाजोगाई शहराच्या विकासाचा पुढील टप्पा मजबूत करण्यासाठी जनविकास आघाडीला मतदानरूपी साथ द्यावी, असे आवाहन आमदार नमिता मुंदडा यांनी केले.


Categories

Recent Posts