Breaking
Updated: नोव्हेंबर 21, 2025
राजकिशोर मोदी यांना जाहीर पाठिंबा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई : नगर परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मुनिर मुसासेठ कुरेशी यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेत लोकविकास महाआघाडीचे उमेदवार राजकिशोर मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. शहरातील निवडणुकीच्या समीकरणात हा महत्त्वपूर्ण बदल मानला जात आहे.
मुनिर कुरेशी यांनी शुक्रवारी दि. २१ नोव्हेंबर रोजी आपला अर्ज मागे घेतला. त्यांच्यासह ऍड. शोभा सुनिल लोमटे यांनीही नगराध्यक्ष पदाचा अर्ज माघारी घेतला. याशिवाय कुरेशी मुनीर मुसासेठ, सिद्दिकी आरेफ अहमद जमील अहमद, वाघमारे अर्जुन गोविंदराव, गोरे धनेश सोपानराव, कांबळे विजय मारुती आणि लोमटे शोभा सुनीलराव यांचा अर्ज माघारी घेणाऱ्यांमध्ये समावेश झाला.
राजकिशोर मोदी यांनी गेल्या तीन दशकांपासून शहरसेवा सुरू ठेवली असून नागरिकांप्रती त्यांचे असलेले सद्भाव लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे मुनिर कुरेशी यांनी सांगितले. अर्ज माघारी घेताना त्यांनी जातीवादी राजकारणाला अटकाव करण्यासाठी, शहरातील धर्मनिरपेक्ष वातावरण टिकवण्यासाठी आणि मतांचे विभाजन रोखण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. कुरेशी कुटुंब आणि सहकारी लोकविकास महाआघाडीच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहतील, असेही त्यांनी नमूद केले.
मुनिर कुरेशी यांच्या या निर्णयामुळे लोकविकास महाआघाडी अधिक मजबूत होऊन शहरवासीयांची सेवा करण्यासाठी सक्षम होईल, असा विश्वास लोकविकास महाआघाडीचे उमेदवार राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केला.