Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

प्रभाग १२ व १५ मधील लोक विकास महाआघाडीच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचा मतदारांचा निर्धार

Updated: नोव्हेंबर 28, 2025

By Vivek Sindhu

प्रभाग १२ व १५ मधील लोक विकास महाआघाडीच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचा मतदारांचा निर्धार

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

राजकिशोर मोदी, माजी आमदार पृथ्वीराज साठे व डॉ.नरेंद्र काळे यांच्या कॉर्नर बैठकीस जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अंबाजोगाई (प्रतिनिधी) – अंबाजोगाई नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकात प्रभाग १२ व प्रभाग १५ मधील लोक विकास महाआघाडीच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचा निर्धार मतदारांनी केला आहे. प्रभाग १२ व १५ मधील लोक विकास महाआघाडीच्या राजकिशोर मोदी, माजी आमदार पृथ्वीराज साठे व डॉ.नरेंद्र काळे यांच्या कॉर्नर बैठकीस जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

लोक विकास महाआघाडीचे प्रभाग १२ मधील नगरसेवक पदासाठीचे उमेदवार शमीम रहीम शेख आणि सय्यद बशीरा शफी तसेच प्रभाग १५ मधील नगरसेवक पदासाठीचे उमेदवार सौ.जयश्री पृथ्वीराज साठे, सौ.रेखा विलास जाधव, विकास रामकृष्ण काकडे हे लोक विकास महाआघाडीचे अधिकृत उमेदवार असून त्यांनाच आपले बहुमुल्य मत देऊन विजयी करावे आणि सेवेची संधी द्यावी असे आवाहन लोक विकास महाआघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजकिशोर मोदी यांनी केले. गुरूवारी लोक विकास महाआघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजकिशोर मोदी यांच्यासह माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी घरोघरी जाऊन, मतदारांशी थेट संवाद साधत मतदानरूपी आशीर्वाद द्यावेत अशी विनंती केली. मोदींना या प्रभागात जनतेने भरभरून प्रतिसाद दिलेला दिसून आला. निवडणूक जवळ आल्याने शहरात राजकीय घडामोडींना वेग आला असून राजकिशोर मोदी यांच्या लोक विकास महाआघाडीला संपूर्ण अंबाजोगाई शहरातून दिवसेंदिवस मोठा पाठींबा वाढत आहे. मोदी यांच्यासह आघाडीच्या सर्वच उमेदवारांची बाजू सातत्याने भक्कम होत असून लोक विकास आघाडी सत्तेत येणार हे जवळपास निश्चित आहे. प्रभाग १२ मधील नगरसेवक पदासाठीचे उमेदवार शमीम रहीम शेख आणि सय्यद बशीरा शफी तसेच प्रभाग १५ मधील नगरसेवक पदासाठीचे उमेदवार सौ.जयश्री पृथ्वीराज साठे, सौ.रेखा विलास जाधव, विकास रामकृष्ण काकडे यांनाही मोठा जनाधार मिळतो आहे. आतापर्यंत या सर्व उमेदवारांनी आपापला संपूर्ण प्रभाग पिंजून काढला असून मतदारातून दोघांच्या उमेदवारीचे उत्स्फूर्त स्वागत होत आहे. व त्यांच्या उमेदवारीला जनतेकडून मोठे पाठबळ मिळत आहे. लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणारे तरूण उमेदवार अशी यांची ओळख या प्रभागात आहे. यासोबतच त्यांच्या पाठीशी राजकिशोर मोदी ठामपणे उभे असल्याने या पाचही उमेदवारांचे निवडणुकीतील पारडे जड आहे. परंतु, विरोधक खोटा व दिशाभूल करणारा प्रचार करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. तरी, प्रभागातील मतदारांनी विरोधकांच्या या अपप्रचारला बळी न पडता लोक विकास महाआघाडीचे प्रभाग १२ मधील नगरसेवक पदासाठीचे उमेदवार शमीम रहीम शेख आणि सय्यद बशीरा शफी तसेच प्रभाग १५ मधील नगरसेवक पदासाठीचे उमेदवार सौ.जयश्री पृथ्वीराज साठे, सौ.रेखा विलास जाधव, विकास रामकृष्ण काकडे यांनाच विजयी करावे असे आवाहन राजकिशोर मोदी यांनी प्रभाग क्रमांक १२ व १५ मधील मतदार बंधू-भगिनींना केले आहे. गुरूवारी लोक विकास महाआघाडीच्या वतीने याप्रसंगी माजी आमदार पृथ्वीराज साठे, नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजकिशोर मोदी, डॉ.नरेंद्र काळे, भिमशक्तीचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष भिमराव सरवदे, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष सुनील जगताप, राष्ट्रवादीचे कल्याण भिसे, सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले, युवा आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष अशोक पालके, बेटी बचाव अभियानचे प्रमुख धिमंत राष्ट्रपाल, विनोद भैय्या शिंदे, विलास जाधव, विकास काकडे यांच्यासह नागरिक, युवक, महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.


Categories

Recent Posts