Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

लोक विकास महाआघाडीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा

Updated: नोव्हेंबर 21, 2025

By Vivek Sindhu

लोक विकास महाआघाडीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

पापा मोदींना नगरपालिका प्रशासन चालविण्याचा मोठा अनुभव, त्यामुळे सर्वसामान्यांना न्याय मिळेल – सुनिल जगताप

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोक विकास महाआघाडीला बुधवारी मोठा राजकीय पाठबळ मिळाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पत्रकार परिषद घेऊन लोक विकास महाआघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजकिशोर मोदी व महाआघाडीच्या नगरसेवकपदासाठी उभ्या असलेल्या सर्वच प्रभागातील उमेदवारांना अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे लोक विकास महाआघाडीचे बळ वाढले आहे. पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोकविकास महाआघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजकिशोर मोदी यांनी जाहीर आभार मानले आहेत‌. तर भाजप समर्थक विरोधकांच्या कोणत्याही भुलथापांना बळी न पडता सुज्ञ मतदारांनी लोक विकास महाआघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजकिशोर मोदी व सर्वच प्रभागातील नगरसेवकपदाच्या उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अंबाजोगाईतील सर्व सुजाण जनतेला करण्यात आले आहे.

अंबाजोगाईत बुधवार, दिनांक १९ नोव्हेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष सुनिल जगताप यांनी सांगितले की, पापा मोदींच्या नेतृत्वाला अंबाजोगाईकरांची नेहमीच पसंती मिळाली आहे. कारण, मोदी यांना नगरपालिका प्रशासन चालविण्याचा मोठा आणि चांगला अनुभव आहे. त्यामुळे अंबाजोगाईचा सर्वांगिण विकास करण्यासाठी जनतेला पुन्हा एकदा पापा मोदी हेच नगराध्यक्ष म्हणून हवे आहेत. आम्ही आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून लोक विकास महाआघाडीला जाहीर पाठिंबा देत आहोत. असे जगताप म्हणाले. तर यावेळी पुढे बोलताना त्यांनी सांगितले आहे की, लोक विकास आघाडीवर अंबाजोगाईकरांचा मोठा विश्वास आहे. कारण, याचे नेतृत्व राजकिशोर पापा मोदी, माजी आमदार पृथ्विराज साठे, माजी उपनगराध्यक्ष बबनराव लोमटे, डाॅ. नरेंद्र काळे, अमर देशमुख इतर पाठिंबा देणारे पक्ष आणि मी व माझे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व सहकारी आम्ही सर्व जण मिळून करीत आहोत. आम्ही पुढील मुद्यांवर पाठिंबा दिला आहे. ते मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत. ते असे की, लोक विकास महाआघाडी ज्यांच्या नेतृत्वात उभी आहे. ते राजकिशोर मोदी यांनी अंबाजोगाईचे नागरीकांसाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत. त्या पुर्ण करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोक विकास महाआघाडीस जाहीर पाठींबा देत आहे. अंबाजोगाई शहरातील गोरगरीबांच्या वस्तीत रमाई आवास घरकुल योजना, पंतप्रधान आवास घरकुल योजना यांसारख्या योजनांची व्याप्ती वाढवून मागेल त्याला घरकुल मिळावे. अंबाजोगाई शहरातील प्राचीन असलेल्या योगेश्वरी देवी मंदीराची तुळजापुर, शिर्डी या तीर्थस्थानांसारखी प्रसिद्धी करून जास्तीत-जास्त भाविक, पर्यटक अंबाजोगाईत कसे येतील व त्या माध्यमातून रोजगार, व्यापाराच्या संधी निर्माण कराव्यात, मुकुंदराज स्वामी मंदीर व परिसर, सर्वज्ञ दासोपंत समाधी व परिसर, हत्तीखाना आदी ऐतिहासीक स्थळांना पर्यटनाच्या दृष्टीने विकसीत करून त्याची प्रसिद्धी करावी. दारिद्र्य रेषेखालील तरूण तरूणींसाठी नगरपरिषदेच्या वतीने टायपींग, काॅप्युटर कोर्स सारखे प्रशिक्षण दरवर्षी किमान २५ विद्यार्थ्यांना शिक्षण स्वरूपात उपलब्ध करून देण्यात यावे, विकास कामांसोबतच शहराच्या सौंदर्यकरणात भर घालावी या सर्व मुद्यांवर पापा मोदी हे विशेष लक्ष देवून आगामी काळामध्ये काम करतील म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज लोक विकास महाआघाडीचे प्रमुख व नगराध्यक्षपदाचे व नगरसेवकपदाचे सर्वच ३१ उमेदवार यांना जाहीर पाठिंबा देत आहोत असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष सुनिल जगताप यांनी यावेळी सांगितले. व शहराच्या विकासाला प्राधान्य देण्यासाठी आणि जनतेच्या मूलभूत प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी लोक विकास महाआघाडी सक्षम असल्याचा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या पाठिंब्यामुळे नगरपरिषद निवडणुकीच्या प्रारंभीच लोक विकास महाआघाडीची ताकद अधिक वाढल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे व दिसून येत आहे. जाहीर पाठिंबा देताना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष श्री कुलकर्णी, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष नितीन परदेशी, मनसे शहर उपाध्यक्ष सागर पवार यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


Categories

Recent Posts