Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

लोक विकास महाआघाडीचे राजकिशोर मोदी यांना विजयी करण्याचा अंबाजोगाईतील युवाशक्तीचा निर्धार

Updated: नोव्हेंबर 22, 2025

By Vivek Sindhu

मोची गल्लीतील अनेक तरूणांचा लोक विकास महाआघाडीत जाहीर प्रवेश

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

मोची गल्लीतील अनेक तरूणांचा लोक विकास महाआघाडीत जाहीर प्रवेश

अंबाजोगाई (प्रतिनिधी) अंबाजोगाई नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक मतदानाची तारीख जस-जशी जवळ येऊ लागली आहे. तस तसा अंबाजोगाई शहरातील युवक वर्ग राजकिशोर मोदी यांच्या नेतृत्वात एकञित होवू लागला आहे. याचाच एक भाग म्हणून शनिवारी शहरातील मोची गल्लीतील अनेक नवतरूणांनी लोक विकास महाआघाडीत जाहीर प्रवेश केला. या युवा मतदारांमुळे युवा नेते संकेत मोदी तसेच राजकिशोर मोदी यांचे पारडे जड झाले आहे. तर लोक विकास महाआघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे.

नगरपरिषद निवडणूकीत यावेळेस ही सर्व नवतरूणाईने एकवटून अंबाजोगाई नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजकिशोर मोदी तसेच त्यांच्या सर्व नगरसेवकांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून आणण्यासाठीचा विडा उचलला आहे. अंबाजोगाई शहरात युवा नेतृत्व संकेत राजकिशोर मोदी यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांची साथ देण्यासाठी अंबाजोगाई शहरातील मोची गल्ली येथील विक्रम कुरील, किरण परदेशी, विलास चौधरी, पारस कुरील, सुरज परदेशी, चेतन परदेशी, तुलसीदास कालिके, देवदत्त चौधरी, योगेश परदेशी, अजय पितांबरे, बाबूलाल परदेसी, जितेन पितांबरे, गोरख कालिके, अनिकेत पितांबरे, अतिश कहेकर यांनी लोक विकास महाआघाडी मध्ये अधिकृत प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयाचा मान राखत महाआघाडीत त्यांचे मनापासून स्वागत केले. नव्या ऊर्जेसह आणि सकारात्मक भावनेने पक्षकार्याची वाटचाल सुरू करणाऱ्या या सर्वांना पुढील राजकीय प्रवासासाठी मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. शहराच्या विविध भागातील असंख्य नवतरूण आज बिनशर्तपणे संकेत मोदी तसेच राजकिशोर मोदी यांच्या समर्थनार्थ उभा राहत आहे. या नवतरूणांचा जोश व उत्साह पाहून पुन्हा एकदा मोदी यांच्या हाती शहराच्या विकासाची धुरा देण्याची जनभावना पुन्हा जोमाने उफाळून येऊ लागली आहे. राजकिशोर मोदी यांनी मागील तीस ते पस्तीस वर्षांपासून अंबाजोगाई शहरासाठी केलेल्या सामाजिक, राजकीय, आर्थिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यावर प्रेरित होऊन आजचा तरूण वर्ग त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा संकल्प करीत आहेत. मोदी यांनी शहरात विविध शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून अंबाजोगाई शहर व परिसरातील हजारो विद्यार्थी उच्चशिक्षित केले आहेत. त्याचबरोबर बॅंक, पतसंस्था, मल्टिस्टेट यांच्या माध्यमातून देखील शेकडो तरूण बेरोजगारांना आर्थिक सहाय्य करून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना सक्षमपणे
उभा केले आहे. बाल- झुंबडच्या माध्यमातून शहर व परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना एक हक्काचे सांस्कृतिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळेच राजकिशोर मोदी हे नांव अंबाजोगाई शहरातील लहानापासून ते वयोवृद्ध नागरिकांच्या मना मनामध्ये घर करून आहे. त्यामुळे अंबाजोगाईकरांचा आशीर्वाद हा संकेत मोदी व राजकिशोर मोदी यांना व त्यांच्या संपूर्ण सहकार्यांना या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत हमखासपणे मिळेल असे चित्र दिसून येत आहे.


Categories

Recent Posts