Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

प्रभाग १२ मधून मोईन शेख यांची उमेदवारी ठरणार समाजसेवेचा नवा अध्याय

Updated: नोव्हेंबर 10, 2025

By Vivek Sindhu

प्रभाग १२ मधून मोईन शेख यांची उमेदवारी ठरणार समाजसेवेचा नवा अध्याय

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई नगर पालिका निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असताना, प्रभाग क्र. १२ मधून प्रख्यात समाजसेवक मोईन रहीम शेख यांनी उमेदवारीची घोषणा केल्याने राजकीय व सामाजिक वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. समाजसेवा, मानवता आणि नेतृत्वगुण यांच्या बळावर त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
मोईन शेख यांना राजकारण आणि समाजसेवेची कौटुंबिक पार्श्वभूमी आहे. त्यांच्या कुटुंबाचा दोन्ही क्षेत्रात नावलौकिक आहे. त्यांचे वडील माजी उपनगराध्यक्ष रहीम शेख हे अंबाजोगाईतील जनतेच्या हृदयात आजही कार्यकर्तृत्वासाठी ओळखले जातात, तर त्यांची आई देखील नगरसेविका राहून समाजकार्यात सक्रीय होत्या. त्यामुळे ‘सेवा हीच परंपरा’ हे या कुटुंबाचे वैशिष्ट्य आहे. वडिलांच्या निधनानंतर शेख मोईन हे दोन भावांच्या सहकार्याने सक्षमपणे त्यांचा वारसा चालवत आहेत
आर.एन. वीट उद्योग समूहाचे संचालक असलेले मोईन शेख व्यवसाय आणि समाजसेवा दोन्ही क्षेत्रात तितक्याच प्रामाणिकतेने कार्यरत आहेत. त्यांनी सामाजिक कार्याचा पाया रोटरी क्लबच्या माध्यमातून रचला. त्यांच्या अध्यक्षीय कार्यकाळात रोटरी क्लब अंबाजोगाईने समाजोपयोगी व लोकहितकारी असे अनेक उपक्रम राबवले. सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याद्वारे सामाजिक एकोपा वाढविणे, आरोग्य व नेत्रतपासणी शिबिरे, डेंटल चेकअप कॅम्प, कुष्ठरोग जनजागृती रॅली, एक्युप्रेशर व कपिंग थेरेपी शिबिरे, “हरित अंबाजोगाई” उपक्रम, शालेय साहित्य आणि मुलींसाठी सायकलींचे वाटप, महिला सक्षमीकरण कार्यक्रम, आशा वर्कर्सना कीट वाटप, “चला उद्योजक होऊया” प्रकल्प, स्वच्छता अभियान आणि ऐतिहासिक धरोहरांची महास्वच्छता मोहीम अशा अनेक योजना त्यांनी प्रभावीपणे राबविल्या.
त्यांच्या नेतृत्वाखाली रोटरी क्लब अंबाजोगाईला प्रांतस्तरीय प्रथम पारितोषिकाचा मान मिळाला, तर मोईन शेख यांना उत्कृष्ट अध्यक्ष पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या संयमी, सौम्य आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे ते आजही रोटरियन आणि नागरिकांच्या मनात आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात.
प्रभाग १२ मधील नागरिकांशी मजबूत संपर्क, सर्व धर्मीय समाजात सन्माननीय स्थान आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. प्रभागातील नागरिकांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छताअशा मूलभूत गरजांवर त्यांनी लक्ष केंद्रित करण्याचे आश्वासन दिले आहे. युवकांना रोजगार आणि उद्योजकतेकडे वळवण्यासाठी मार्गदर्शन केंद्र, करिअर काउन्सिलिंग आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचा त्यांचा मानस आहे.
वडिलांचा राजकीय वारसा, स्वतःची कार्यक्षमता, तत्परता आणि प्रभागातील प्रत्येकाशी असलेळे जिव्हाळ्याचे संबंध यामुळे ते प्रभाग १२ साठी सक्षम आणि उमेदवार म्हणून पुढे आले आहेत. समाजातील सर्व घटकांशी असलेल्या सुसंवाद ही त्यांची खरी ताकद ठरणार आहे. अनुभवी, सुशिक्षित, समाजाभिमुख आणि सर्वधर्मीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या मोईन शेख यांची नगर पालिका निवडणुकीतील उमेदवारी केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाचा प्रयत्न ठरणार आहे.


Categories

Recent Posts