Breaking

अंगणात झोपलेल्या वृद्धेच्या घरामधून ६० हजारांचे दागिने व रोकड लंपास

Updated: जून 8, 2026

By Vivek Sindhu

अंगणात झोपलेल्या वृद्धेच्या घरामधून ६० हजारांचे दागिने व रोकड लंपास

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

आष्टी: तालुक्यातील चिंचाळा पाटीलवस्ती येथे एक धक्कादायक घरफोडीची घटना समोर आली आहे. ६ जून रोजी रात्री ११ वाजेपासून ते ७ जून रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान फिर्यादी ताराबाई राधाकिसन पोकळे (वय ५८) आणि त्यांचे कुटुंबीय नेहमीप्रमाणे जेवण करून घराबाहेर अंगणात झोपले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश केला. चोरट्याने घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम ठेवलेल्या पेट्या घराच्या पाठीमागे नेल्या. तेथे पेट्या फोडून त्यातील अंदाजे दोन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, ज्यामध्ये बाळ्या, ओम आणि अंगठ्यांचा समावेश आहे, तसेच सुमारे ८०० ग्रॅम वजनाचे चांदीचे लहान मुलांचे कडे, चैन आणि साखळ्या असा ६० हजार रुपयांचा ऐवज आणि ३०० रुपयांची नगदी रोकड चोरून नेली. या प्रकरणी ताराबाई पोकळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आष्टी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ अंतर्गत गुन्हा रजिस्टर नंबर २६९/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून पुढील तपास पोलीस हवालदार क्षीरसागर करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.


Categories

Recent Posts