Breaking

परळीत भरदिवसा घरफोडी; उघड्या घरातून सोन्याच्या दागिन्यांसह १ लाख ३० हजारांचा मुद्देमाल लंपास

Updated: जून 6, 2026

By Vivek Sindhu

परळीत भरदिवसा घरफोडी; उघड्या घरातून सोन्याच्या दागिन्यांसह १ लाख ३० हजारांचा मुद्देमाल लंपास

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

परळी: शहरात भरदिवसा घरफोडीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सिंचन भवनसमोरील सर्किट हाऊस रस्त्यावरील ‘विष्णुपुरी’ बंगल्यात ४ जून २०२६ रोजी सकाळी साडेधा वाजेच्या सुमारास ही चोरी झाली. अज्ञात चोरट्याने घरात घुसून कपाटात ठेवलेली नगदी रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला असून या प्रकरणी ५ जून रोजी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याचे रहिवासी असलेले प्रशांत विष्णुपंत मुंडे यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे.

प्रशांत मुंडे यांच्या आई परळी येथील विष्णुपुरी बंगल्यात वास्तव्यास आहेत. घटनेच्या दिवशी घराचा दरवाजा उघडा असल्याचा गैरफायदा घेत एका अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. चोरट्याने बेडरूममधील उघड्या कपाटातून ९० हजार रुपयांची नगदी रोकड आणि ४० हजार रुपये किमतीचे ९ तोळे २ ग्रॅम वजनाचे जुने वापरते सोन्याचे दागिने असा मुद्देमाल शिताफीने लंपास केला. घरून रोकड आणि दागिने गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर मुंडे यांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली. परळी शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०३(२) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पोलीस उपनिरीक्षक डी. डी. राठोड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts