Breaking
Updated: जून 8, 2026
बहीणीच्या घरी वडिलांना मारहाण केल्यानंतर अज्ञात तरुणाने घर पेटवलेबहीणीच्या घरी वडिलांना मारहाण केल्यानंतर अज्ञात तरुणाने घर पेटवले
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelगेवराई: तालुक्यातील देवपिंप्री येथे कौटुंबिक वादातून आणि दारूच्या नशेत एका तरुणाने वृद्धाला मारहाण करून घर पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ६ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास फिर्यादी गणेश सुंदरराव गवारे हे त्यांच्या बहिणीच्या घरी असताना, आरोपी अनिल रामभाऊ गवारे याने दारूच्या नशेत येऊन फिर्यादीच्या वडिलांना बेदम मारहाण केली आणि शिवीगाळ करून तेथून निघून गेला. एवढ्यावरच न थांबता, रात्री नऊ वाजेच्या सुमारास फिर्यादी घरात नसताना आरोपीने त्यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडले आणि घरातील कपड्यांची जाळपोळ करून मोठे नुकसान केले.
या संतापजनक घटनेनंतर गणेश गवारे यांनी गेवराई पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी ७ जून रोजी रात्री आरोपी अनिल गवारे विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२६ (फ), ३३१ (२), ११५ (२), ३५२ आणि ३२४ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सामाजिक शांतता आणि कौटुंबिक सुरक्षेला आव्हान देणाऱ्या या घटनेमुळे देवपिंप्री गावात तीव्र संताप व्यक्त होत असून पोलीस हवालदार राठोड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.