Breaking

वृद्धाचा प्रामाणिकपणा आणि अंबाजोगाई पोलिसांची तत्परता

Updated: जून 6, 2026

By Vivek Sindhu

InShot 20260606 212923522

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

सव्वादोन लाखांचे हरवलेले दागिने महिलेला मिळाले परत

अंबाजोगाई: घाईगडबडीत रिक्षात बसताना रस्त्यावर पडलेली २ लाख २५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची पिशवी अंबाजोगाई शहर पोलिसांनी २४ तासांच्या आत शोधून मूळ मालक महिलेला सुपूर्द केली. एका वृद्ध नागरिकाचा प्रामाणिकपणा आणि पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दाखवलेली तत्परता यामुळे हा सुखरूप सोक्षमोक्ष लागला. मंगळवारी, २ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अंबाजोगाई येथील शिवाजी चौक परिसरातील चेन्नई ऑटो पॉईंटजवळ ही घटना घडली होती.

image editor output image 1703922413 17807626458838627389173224100118

मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, अंबाजोगाई तालुक्यातील चेन्नई येथील रहिवासी रेखा युवराज क्षीरसागर या लोखंडी सावरगाव येथून ऑटो रिक्षाने प्रवास करत अंबाजोगाईतील शिवाजी चौकात आल्या होत्या. रिक्षात बसण्याच्या आणि उतरण्याच्या घाईत त्यांच्या हातातील दागिन्यांची पिशवी अचानक खाली पडली. या पिशवीत ५६ मणी, दोन सोन्याचे पिळ्याचे पेंडल आणि दोन सोन्याचे झुंबर असे सुमारे दीड तोळे वजनाचे सोन्याचे दागिने होते. पिशवी गहाळ झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.

image editor output image 950841961 17807626812524051522197934880440

तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तात्काळ पावले उचलत घटनास्थळावरील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी सुरू केली. या फुटेजमध्ये एक व्यक्ती ती पडलेली पिशवी उचलून स्वतःजवळ ठेवताना दिसून आली. पोलिसांनी अधिक तपास केला असता ती व्यक्ती भीमनगर (मांडवा रोड, परळी वेस, अंबाजोगाई) येथील ६५ वर्षीय वृद्ध खंडू अंबादास साळवे असल्याची ओळख पटली. पोलिसांनी साळवे यांच्या घरी जाऊन चौकशी केली असता, त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे ती पिशवी आपल्याकडे सुरक्षित असल्याचे सांगितले. पिशवी नेमकी कोणाची आहे हे माहीत नसल्याने आपण ती सांभाळून ठेवल्याचे सांगत त्यांनी ती पोलिसांच्या स्वाधीन केली.

अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या हस्ते रेखा क्षीरसागर यांना त्यांचे २ लाख २५ हजार रुपयांचे दागिने अत्यंत भावनिक वातावरणात परत करण्यात आले. आपले कष्टाचे दागिने सुखरूप परत मिळाल्यामुळे क्षीरसागर यांनी पोलिसांचे आणि खंडू साळवे यांचे डोळ्यात पाणी आणून आभार मानले. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पोलीस हवालदार पांडुरंग काळे आणि पोलीस अंमलदार हनुमंत चादर यांनी सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करून संबंधित वृद्धाचा शोध घेण्याकामी अत्यंत मोलाची आणि कौतुकास्पद कामगिरी बजावली.


Categories

Recent Posts