Breaking

चिखली नाथ येथे धाडसी घरफोडी; तीन अज्ञात चोरट्यांनी लुटला ७४ हजारांचा ऐवज

Updated: जून 8, 2026

By Vivek Sindhu

चिखली नाथ येथे धाडसी घरफोडी; तीन अज्ञात चोरट्यांनी लुटला ७४ हजारांचा ऐवज

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

पाटोदा: तालुक्यातील चिखली नाथ येथे एकाच रात्री घरफोडीची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. ६ जून रोजी रात्री २ ते २.३० वाजेच्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी मंगलबाई शिवाजी मिसाळ यांच्या राहत्या घराच्या किचनचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाटाचे आणि ड्राव्हरचे लॉक तोडून आत ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. या चोरीमध्ये एकूण ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. फिर्यादी मंगलबाई मिसाळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून ७ जून रोजी रात्री अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चोरट्यांनी याच रात्री गावातील मच्छिंद्र त्रिंबक लाड यांच्या घरीही चोरी केल्याचे समोर आले असून ग्रामीण भागातील वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५, ३३१(४) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल केला असून सहाय्यक फौजदार शिंदे पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts