Breaking
Updated: May 29, 2025
WhatsApp Group
Join Nowकेज – बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी जागरूक नागरिकांनी पोलिसांना माहिती देऊन सहकार्य करावे. ज्या ठिकाणी गुन्हेगारी घडण्याची शक्यता असेल त्याची माहिती जागरूक नागरिकांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.
केज येथे २८ मे रोजी केज येथे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी शांतता समितीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना, नायब तहसीलदार अशोक भंडारे, केजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव मांजरमे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश बनसोडे, युसुफवडगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे, धारूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक देविदास वाघमोडे, नेकनूरचे चंद्रकांत, फौजदार उमेश निकम, सुकुमार बनसोडे, आनंद शिंदे नायब तहसीलदार अशोक भंडारे हे उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी तालुक्यातील मोटरसायकल चोरी, बस स्टँडवर होणाऱ्या नियमित चोऱ्या रोखण्यासाठी पोलिस मदत केंद्र सुरू करणे, रस्त्यावरील वाहतूक, ट्युशन परिसरातील छेडछाडीचे प्रकार, फेरीवाले, मिरवणुकीतील कर्कश आवाजातील डी जे, गाड्यांचे फॅन्सी नंबर प्लेट, गोवंश वाहतूक, मेडिकलरून विकले जाणारे कफ सिरप नशेसाठी वापरले जात जाणे, गायरान जमिनीवरील अतिक्रमणे, अवैध व चोरटी दारू वाहतूक आणि विक्री या आणि इतर समस्यांबाबत माहिती दिली.
त्यावर पोलिस अधीक्षकांनी मत व्यक्त करताना म्हणाले की, केज येथील बस स्टँड परिसरात तत्काळ पोलिस मदत केंद्र सुरू केले जाईल. तसेच कोणी कायदा हातात घेऊ नये आणि जागरूक नागरिकांनी जर सीसीटीव्ही बसविले तर गुन्हेगार निष्पन्न करण्यासाठी त्याचा फायदा होईल. तसेच अवैध्य पुतळ्या बाबतही त्यांनी दक्षता घेण्याचे आवाहन केले. या बैठकीत केज, धारूर, नेकनुर येथील नागरिक उपस्थित होते.