Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

नेकनूरमध्ये कापड व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला; लोखंडी रॉडने केले जखमी

Updated: जानेवारी 17, 2026

By Vivek Sindhu

लोखंडी रॉडने केले जखमी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

नेकनूर : दुकान बंद करून घरी जाणाऱ्या एका कापड व्यापाऱ्याला अडवून त्याच्यावर कार घालून आणि लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना १० जानेवारी रोजी रात्री घडली. जुन्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे.

नेकनूर येथील ३४ वर्षीय कापड व्यापारी मुमुफस्सर मोहम्मदहुसेन कुरेशी हे १० जानेवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास आपले दुकान बंद करून घराकडे जात होते. त्यांच्या दुकानासमोरच आरोपी अहमद चाँद मनियार, कलिमा चाँद मनियार, अस्लम चाँद मनियार आणि चाँद शोभले मनियार यांनी त्यांना गाठले. अस्लम याने त्याच्या ताब्यातील कार (एमएच १६ सीएच ७६४२) कुरेशी यांच्या अंगावर घालून त्यांच्या पायाला दुखापत केली. त्यानंतर अहमद याने लोखंडी रॉडने कुरेशी यांच्या डोक्यात वार करून गंभीर जखमी केले. अस्लमने लाकडी काठीने मारहाण केली. या प्रकरणी नेकनूर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पोलीस उपनिरीक्षक रोकडे तपास करत आहेत.


Categories

Recent Posts