Breaking

बाजरीचे पीक पाण्याखाली जाण्याच्या मार्गावर

Updated: June 4, 2025

By Vivek Sindhu

बाजरीचे पीक पाण्याखाली जाण्याच्या मार्गावर

WhatsApp Group

Join Now

धारूर – धारूर तालुक्यातील कुंडलिका तलाव उपळी पाण्याने 100/भरण्याच्या मार्गावर आहे यावर्षी बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील उद्धव कुंडलिका मे महिन्यातच ओव्हर फ्लोहोऊन त्याचे पाणी कूंडलिका तलावात सोडण्यात आले आहे उर्ध्व कुंडलिका पाण्याने शंभर टक्के भरले आहे त्यामुळे त्या तलावाचे दोन दरवाजे खुले करून पाणी कुंडलिका नदीपत्रा मध्ये सोडण्यात आले आहे .


पाण्याची आवक वरचेवर वाढत आहे त्यामुळे कुंडलिका तलाव उकळी हा पाण्याने शंभर टक्के पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहे तलावाची पाणी पातळी रोज 10 फूट वाढत असून या परिसरातील शेतकऱ्यांनी गाळपेऱ्या मध्ये बाजरीची पीक व उन्हाळी मुगाचे पिकं घेतली आहेत ती पिके सध्या पाण्याखाली जाऊ लागली आहेत.

कमीत कमी रोज दहा फूट पाणी या परिसरामध्ये वाढत असल्यामुळे तलावातील खोल खोल असणारे खड्डे पाण्याने पूर्ण भरले असून उथळ माथ्यावर सध्या पाणी शिरण्याच्या मार्गावर आहे पाण्याचा जोर वाढल्यास येत्या दहा ते बारा दिवसांमध्ये कुंडलिका तलाव पाण्याने ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे.

सध्या या तलावातील पाणीसाठा 75 टक्के जवळ वाढला आहे हा तलाव 25 टक्के भरने बाकी असून त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचा पाण्याचा व पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे परंतु शेतकऱ्यांनी पेरलेल्या उन्हाळीबाजऱ्या या पूर्णतः पाण्याखाली जाणार आहेत त्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक नुकसान ही होणार आहे.

यावर्षी मे महिन्यामध्ये तलावातील पाणी पातळी वाढल्यामुळ लवकरच तलाव 100% पूर्ण होतील असा विश्वास या परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे .