Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीच्या वतीने परसबाग प्रकल्पासाठी शहरातून श्री.खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाची निवड.

Updated: डिसेंबर 18, 2025

By Vivek Sindhu

औषध मुक्त फळभाज्या पिकविण्याचा विद्यार्थी शिक्षकांनी केला संकल्प

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

औषध मुक्त फळभाज्या पिकविण्याचा विद्यार्थी शिक्षकांनी केला संकल्प

अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- येथील रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीच्या वतीने रोटरी परसबाग इन स्कुल या उपक्रमासाठी शहरातील श्री.खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शालेय समितीचे अध्यक्ष अविनाश मुडेगांवकर,
प्रमुख मार्गदर्शक म्हणून रोटरीयन उध्दव शिरसाट तर मंचावर रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाईच्या अध्यक्षा प्रा.रोहिणी पाठक,रोटरी उपाध्यक्ष धनराज सोळंकी,प्रा.अजय पाठक,विद्यालयाचे मुख्याध्यापक अनंतराम कोपले,
उपमुख्याध्यापक शैलेंद्र कंगळे,पर्यवेक्षक सुर्यकांत उजगरे हे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.उपस्थित
मान्यवरांचे यथोचित स्वागत करण्यात आले.

प्रमुख मार्गदर्शक म्हणून रोटरीयन उध्दव शिरसाट म्हणाले की,सध्याच्या काळात पिकांवर रासयनिक औषधांचा खुप मारा केला जातोय त्यामुळे आपल्यापर्यंत येणारे फळ,फळभाज्या हे रसायन युक्त येत आहेत.त्यामुळे आपण जास्तीत जास्त सेंद्रिय शेती,फळ,फळभाज्या पिकविणा-यावर भर दिला पाहिजे.आज मानवाचे जीवन जगण्याचे आयुर्मान कमी झाले आहे त्याचे महत्वाचे कारण हेच आहे.मी सेंद्रिय शेतीसाठी जनजागृती करण्यासाठी भारतातच नव्हे तर परदेशातही फिरत असतो.परसबाग प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्यातील अनेकांना या कामाविषयी जागृरकता निर्माण होईल.
आपल्या शाळेतील परसबाग ही परिसरातील नागरीकांसाठी शाळेसाठी आदर्शवत नक्की होईल असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अध्यक्षीय समारोप करताना अविनाश मुडेगांवकर म्हणाले की,मला या गोष्टींचा आनंद आहे की आमची शाळा या प्रकल्पासाठी निवडली गेली.आम्ही सर्वजण या परसबाग निर्मिती मध्ये सहभाग घेऊन रोटरीने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू.

यावेळी सेवानिवृत्त झाल्याबद्दल प्रा.पाठक सरांचा व धनराज सोळंकी यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक अनंतराम कोपले यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याध्यापक शैलेंद्र कंगळे,पर्यवेक्षक सुर्यकांत उजगरे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,स्वागत परीचय,आभार सुरेखा काळे यांनी मानले तर प्रास्ताविक प्रा.रोहिणी पाठक यांनी केले.कल्याण मंत्र किशोरी कुलकर्णी यांनी घेतला.


Categories

Recent Posts